घरदेश-विदेशइस्त्रोच्या शास्त्रज्ञांना 'विक्रम लँडर' सापडले!

इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना ‘विक्रम लँडर’ सापडले!

Subscribe

ऑर्बिटरला विक्रम लँडरची माहिती मिळाली असून ऑर्बिटरने लँडरचे फोटो काढले असल्याची माहिती इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली आहे.

भारतीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ऑर्बिटरला विक्रम लँडरची माहिती मिळाली असून ऑर्बिटरने लँडरचे फोटो काढले असल्याची माहिती इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांनी एएनआयला दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, ऑर्बिटरने विक्रम लँडरचे फोटो काढले आहेत. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

चांद्रयान २ मोहिमेच्या अंतिम टप्प्या लँडर विक्रम चंद्रावर उतरण्यास अवघे २.१ मिनिटे बाकी असताना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑर्बिटर आणि लँडरचा संपर्क तुटला. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम असणाऱ्या चांद्रयान२मधून अपेक्षित असं यश जरी मिळू शकलं नसलं, तरी या मोहिमेसाठी देशभरातून आणि परदेशातून देखील इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर कौतुकाची थाप पडत आहे. जागतिक अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाने इस्रोच्या चांद्रयान २ मोहिमेचं कौतुक देखील केलं आहे.

- Advertisement -

 

अवघ्या २.१ किमी अंतरावर संपर्क तुटला

जवळपास संपूर्ण मोहीम अगदी सुरळीत सुरू असताना अखेरच्या दोन मिनिटांमध्ये इस्त्रोच्या हाती निराशा आली. भारतीय चांद्रयान-२ चे विक्रम हे लँडर शनिवारी पहाटे १ वाजून ५५ मिनिटांनी चंद्राछ्या दक्षिण ध्रुवार सॉफ्ट लँडिंग करण्याच्या तयारीत असताना ऑर्बिटरचा आणि लँडरचा संपर्क तुटला. लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटरपर्यंत पोहोचले. तोपर्यंत त्याचा नियोजित दिशेने प्रवास सुरळीत सुरू होता. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. त्यामुळे लँडरची दिशा आणि ठिकाण कळण्यात अडचणी निर्माण झाल्या. पर्यायी योजनेच्या माध्यमातून आकडेवरी मिळवण्यासाठी शास्त्रज्ञ कामाला लागले होते. इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले की, मिळालेल्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात येत आहे.


हेही वाचा – Chandrayan 2 : नेमकं काय घडलं विक्रम लँडरचा इस्त्रोशी संपर्क तुटताना


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -