घरदेश-विदेशChandrayan 2 : नेमकं काय घडलं विक्रम लँडरचा इस्त्रोशी संपर्क तुटताना

Chandrayan 2 : नेमकं काय घडलं विक्रम लँडरचा इस्त्रोशी संपर्क तुटताना

Subscribe

चांद्रयान २ मोहिमेच्या अंतिम टप्प्यात लँडर विक्रम चंद्रावर उतरण्यास अवघे २.१ मिनिटे बाकी असताना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑर्बिटर आणि लँडरचा संपर्क तुटला. त्यानंतर इस्रोचे वैज्ञानिक हताश झाले होते. नेमकं काय घडलं याचं कुतूहल सर्वच भारतीयांना आहे. शुक्रवारी रात्री सगळ्या जगाचं लक्ष लँडर विक्रमकडे लागले असताना ते चंद्रावर उतरलेच नाही. यावेळी इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी लँडर विक्रमचा संपर्क इस्त्रोशी तुटल्याचे सांगितले.

अवघ्या २.१ किमी अंतरावर संपर्क तुटला 

जवळपास संपूर्ण मोहीम अगदी सुरळीत सुरू असताना अखेरच्या दोन मिनिटांमध्ये इस्त्रोच्या हाती निराशा आली. भारतीय चांद्रयान-२ चे विक्रम हे लँडर शनिवारी पहाटे १ वाजून ५५ मिनिटांनी चंद्राछ्या दक्षिण ध्रुवार सॉफ्ट लँडिंग करण्याच्या तयारीत असताना ऑर्बिटरचा आणि लँडरचा संपर्क तुटला. लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटरपर्यंत पोहोचले. तोपर्यंत त्याचा नियोजित दिशेने प्रवास सुरळीत सुरू होता. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. त्यामुळे लँडरची दिशा आणि ठिकाण कळण्यात अडचणी निर्माण झाल्या. पर्यायी योजनेच्या माध्यमातून आकडेवरी मिळवण्यासाठी शास्त्रज्ञ कामाला लागले होते. इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले की, मिळालेल्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात येत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -