घरदेश-विदेशपी. चिदंबरम आज सीबीआय कोर्टात राहणार हजर

पी. चिदंबरम आज सीबीआय कोर्टात राहणार हजर

Subscribe

सीबीआय पी. चिदंबरम यांची १४ दिवसांची कोठडी मागणार आहे. तसेच गुरूवारी दुपारी २ वाजता सीबीआय कोर्टात चौकशी करता राहणार हजर

गेल्या २ दिवसांपासून पी. चिदंबरम यांच्या अटकेवरून सुरू असलेल्या नाट्याचं रूपांतर बुधवारी अखेर हाय व्होल्टेज ड्रामामध्ये झालं. उच्च न्यायालयाने पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अखेर सीबीआयने त्यांच्या जोरबाग येथील घरून त्यांना ताब्यात घेतलं. मात्र, त्याआधी त्यांच्या घराबाहेर झालेला ड्रामा सगळ्या देशानं पाहिला. त्याच्या काही मिनिटं आधीच पी. चिदंबरम यांनी काँग्रेसच्या कार्यालयात जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोप फेटाळले होते. ‘माझ्यावर कोणतीही चार्जशीट नाही, आरोप दाखल नाही, त्यामुळे मी गायब होण्याचा प्रश्नच नाही’, असा दावा पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत केला होता. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पी. चिदंबरम यांना अटक केले आहे.


हेही वाचा – सीबीआयने अखेर पी. चिदंबरम यांना घेतलं ताब्यात

आज दुपारी २ वाजता सीबीआय कोर्टात हजर

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर बुधवारी दिवसभराच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर रात्री दहा वाजता सीबीआयने अटक करण्यात आली आहे.  याच पार्श्वभूमीवर सीबीआय पी. चिदंबरम यांची १४ दिवसांची कोठडी मागणार आहे. तसेच गुरूवारी दुपारी २ वाजता सीबीआय कोर्टात चौकशी करता हजर राहणार आहे. सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामिनबाबत दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि आपली बाजू मांडल्यानंतर सीबीआयने कारवाई केली.

- Advertisement -

२७ तास अदृश्य असलेले पी. चिदंबरम पत्रकार परिषदेत म्हणाले…

आयएनएक्सप्रकरणी पी चिदंबरम यांची ईडीनं चौकशी केल्यानंतर त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील न्यायालयानं फेटाळला. या पार्श्वभूमीवर पी. चिदंबरम यांनी स्वत:च पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या २७ तासांमध्ये माझ्यावर कायद्यापासून पळ काढून लपल्याचे आरोप केले गेले. मात्र, या २७ तासांमध्ये मी माझ्या वकिलांच्या टीमसोबत कायद्यासमोर न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो. त्यामुळे या आरोपांचं मला आश्चर्य वाटतं असं यावेळी पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. तसेच, येत्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात मी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत कायद्यासमोर न्याय मिळेल, अशी आशा आपण ठेऊयात, असं देखील पी. चिदंबरम यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -