घरमुंबईआज राज ठाकरे ईडी कार्यालयात हजर राहणार

आज राज ठाकरे ईडी कार्यालयात हजर राहणार

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी राज ठाकरे सकाळी अकरा वाजता ईडी कार्यालयात दाखल होणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी ईडीने चौकशीची नोटीस बजावली आहे. या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची आज चौैकशी होणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी ईडीच्या चौकशीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहे. राज ठाकरे आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात दाखल होणार आहेत. दरम्यान, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज ठाकरे यांचे कृष्णकुंज निवास्थान ते ईडी कार्यालय जाण्यासाठी पोलिसांकडून वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आला आहे.

आज फक्त राज ठाकरेंचीच चौकशी होणार

कोहिनूर मिल खरेदी प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेश जोशी आणि राजन शिरोडकर यांची गेल्या तीन दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरु होती. आज ईडीकडून फक्त राज ठाकरे यांची चौकशी होणार आहे.

- Advertisement -

राज यांचा कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला 

राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे अनेक कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. मात्र कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात कोणतेही पाऊल उचलू नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

काय आहे कोहिनूर मिल खरेदी प्रकरण?

उन्मेश जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांनी २००३ मध्ये कोहिनूर मिल नंबर ३ ही जागा लिलाव पद्धतीने विकत घेतली होती. ही जागा ४२१ कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली होती. या जागेवर कोहिनूर स्क्वेअर नावाची बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. ही इमारत उभारण्यासाठी उन्मेश जोशी यांच्या मालकीची कोहिनूर सीटीएनएल कंपनी काम करत होती. राज ठाकरे आणि राजन शिरोडकर बरोबरीचे भागीदार होते. कोहिनूर मिल जागेवर अवाढव्य बहुमजली इमारत बांधली जात आहे. त्यामुळे भविष्यातील व्यापाऱ्याच्या दृष्टीकोनाने सरकारी क्षेत्रातील कंपनी आयएल अँड एफएसने २२५ कोटी रुपयांची गुंतवणूक कोहिनूर सीटीएनएलमध्ये केली. परंतु, २००८ मध्ये या कंपनीने आपले २२५ कोटी रुपयांचे सर्व शेअर्स फक्त ९० कोटी रुपयांत कोहीनूर एमटीएनएल कंपनीला विकले. विशेष म्हणजे त्याचवेळी राज ठाकरे यांनी देखील आपले सर्व शेअर्स कंपनीला विकले आणि कंपनीतून काढता पाय घेतला.

- Advertisement -

यानंतर कोहिनूर सीटीएनएल सोबत गुंतवणुकीत मोठा तोटा सहन केल्यानंतरही कंपनी आयएल अँड एफएसने कोहिनूर सीटीएनएलला अॅडव्हान्स लोन दिले. मात्र, त्या कर्जावर उन्मेश जोशींच्या कंपनीला भागले नाही. कर्जाचे परतफेड करण्यासाठी उन्मेश यांच्या कंपनीने आपली संपत्ती विकून ५०० कोटी रुपयांचे कर्ज भागवण्याच्या करारावर सह्या केल्या. या करारानंतरही आयएल अँड एफएस कंपनीने कोहिनूर सीटीएनएल कंपनीला १३५ कोटींचे कर्ज दिले. यामध्ये आयएल अँड एफएस कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता विषय ईडीकडे गेला आहे. ईडीने याअगोदर आयएल अँड एफएस कंपनीच्या एका बड्या अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला आहे. त्यानंतर आता उन्मेश जोशी यांची चौकशी होत आहे. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांची चौकशी ईडीकडून होणार आहे.


हेही वाचा – कार्यकर्त्याच्या आत्महत्येवर राज ठाकरे व्यथित; पुन्हा केली ‘ही’ विनंती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -