घरदेश-विदेशइस्लामिक वेब ब्राउजर 'सलाम वेब'ला मागणी!

इस्लामिक वेब ब्राउजर ‘सलाम वेब’ला मागणी!

Subscribe

'सलामवेब' हे मोबाईल ब्राउजर अॅप मुस्लीमांना आपलेपणाचा अनुभव देतं, असा दावा निर्मात्यांकडून करण्यात आला आहे.

मलेशियातल्या एका स्टार्टअप कंपनीने ‘इस्लामिक मूल्यांना प्रमाण मानणाऱ्या इंटरनेट ब्राउजरची बाजारात प्रचंड मागणी आहे’, असं सांगत ‘SalamWeb’ हे ब्राउजर लाँच केलं आहे. पूर्वग्रहदूषित व चारीत्र्यहनन करणाऱ्या इंटरनेटवरील पोस्ट तसंच खासगी डेटाची चोरी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हे ब्राउजर गरजेचं असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. ‘सलामवेब’ हे मोबाईल ब्राउजर अॅप मुस्लीमांना आपलेपणाचा अनुभव देतं, असा दावा करण्यात आला आहे. या अॅपमध्ये मेसेजिंगची सेवा, बातम्या तसंच अन्य फीचर्सचा समावेश आहे. या ब्राउजरचे युजर्स सध्या मलेशिया व इंडोनेशियामध्ये  असल्याचे सलाम वेब टेक्नॉलॉजीजच्या व्यवस्थापकीय संचालक हसनी झरीना मोहम्मद खान यांनी सांगितल्याचे वृत्त ब्लूमबर्गनं दिलं आहे. एका खासगी रिपोर्टनुसार, जगामध्ये मुस्लीमांची एकूण संख्या 1.8 अब्ज इतकी आहे. त्यापैकी १० टक्के म्हणजे साधारण १८ लाख मुस्लीम हे अॅप वापरतील याकडे लक्ष दिलं जात असल्याचं, कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

कंपनीच्या अधिकारी हसनी झरीना यांच्या म्हणण्यानुसार, ‘इंटरनेट ही चांगली जागा व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. इंटरनेटवर चांगल्या गोष्टी आहेत आणी वाईट गोष्टीही आहेत. त्यामुळे लोकांना इंटरनेटवरील केवळ चांगल्या गोष्टींचा अनुभव देणं, हा सलामवेब अॅपचा प्रयत्न आहे.’ त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सलामवेब अॅप वेबपेजेसना योग्य, तटस्थ व अयोग्य अशा दोन भागात विभागणार आहे.  तसेच अश्लील व जुगाराच्या साईट्ससंदर्भात तशी आगाऊ सूचना देण्यात येणार आहे.’ ‘जागतिक मूल्ये रूजवण्याचा उद्देशातून या अॅपची निर्मीती करण्यात आली असून, याद्वारे प्रामुख्याने मुस्लिमांना लक्ष्य करण्यात येणार आलं आहे. मात्र, अन्य धर्मीय लोकंही हे अॅप वापरू शकतात’, असं हसनी यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

मुस्लीमांना लागणाऱ्या प्रार्थनेच्या वेळा, कुठल्या दिशेनं प्रार्थना करायची याची माहितीही ‘सलामवेब’ अॅपवरुन देण्यात येणार आहे.


वाचा : ‘युती झाली तरच सत्ता मिळेल’, मुख्यमंत्र्यांचे संकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -