घरदेश-विदेशISRO: 2040 मध्ये चंद्रावर उतरण्याचे लक्ष्य; इस्रो प्रमुखांनी सांगितले उद्दिष्ट

ISRO: 2040 मध्ये चंद्रावर उतरण्याचे लक्ष्य; इस्रो प्रमुखांनी सांगितले उद्दिष्ट

Subscribe

इस्रो अध्यक्षांनी भारतीय अंतराळ संस्थेच्या इंस्टाग्राम पेजद्वारे अंतराळ प्रेमींशी संवाद साधला. हा संवाद तासभर चालला. सोमनाथ यांनी मे महिन्यात पुन्हा संवाद साधणार असल्याचे आश्वासन दिले. हा कार्यक्रम तरुण पिढीशी जोडण्याचा प्रयत्न आहे. यावेळी सोमनाथ म्हणाले की, खाजगी कंपन्या अंतरिक्षमध्ये जाणं अधिक सुलभ करतील आणि या क्षेत्रातील संशोधनाला गती देण्यास मदत करतील.

बंगळुरू: इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी भारतीय अंतराळ संस्थेच्या इन्स्टाग्राम पेजद्वारे अंतराळ प्रेमींशी संवाद साधला. हा संवाद तासभर चालला. सोमनाथ यांनी मे महिन्यात पुन्हा संवाद साधणार असल्याचे आश्वासन दिले. हा कार्यक्रम तरुण पिढीशी जोडण्याचा प्रयत्न आहे. यावेळी सोमनाथ म्हणाले की, खासगी कंपन्या अंतरिक्षमध्ये जाणं अधिक सुलभ करतील आणि या क्षेत्रातील संशोधनाला गती देण्यास मदत करतील.(ISRO Aims to land on Moon in 2040 ISRO chief Sreedhara Panicker Somanath stated the objective)

या कंपन्यांनी घेतलीय रॉकेटची चाचणी

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख सोमनाथ यांनी शनिवारी सांगितले की, भारतात आधीपासूनच दोन कंपन्या आहेत – स्कायरूट एरोस्पेस आणि अग्निकुल कॉसमॉस या अवकाश क्षेत्रात कार्यरत आहेत. भारताला अशा प्रकारे पुढे जाताना पाहून आम्ही उत्साहित आहोत. या कंपन्यांनी यापूर्वी रॉकेटची चाचणी घेतली आहे.

- Advertisement -

चांद्रयान-4 चे उद्दिष्ट काय?

चांद्रयान-4 शी संबंधित प्रश्नाचे उत्तर देताना सोमनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2040 मध्ये चंद्रावर उतरण्याचे भारताचे उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले आहे. चांद्रयान-4 हे या उद्दिष्टाच्या दिशेने पहिले पाऊल असेल. चंद्रावर प्रोब पाठवणे, नमुने गोळा करणे आणि पृथ्वीवर आणणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

मिशन एक रॉकेट दोन

एकच मिशन पूर्ण करण्यासाठी प्रथमच दोन रॉकेट सोडण्यात येणार असल्याची माहिती इस्रोने दिली. यावेळी चांद्रयान-4 चंद्राच्या खडक आणि माती (रेगोलिथ) सोबत परत येईल. दोन भिन्न रॉकेट, हेवी लिफ्टर LVM-3 आणि इस्रोचे वर्कहॉर्स PSLV, एकाच चंद्र मोहिमेसाठी वेगवेगळे पेलोड वाहून नेतील आणि वेगवेगळ्या दिवशी प्रक्षेपित केले जातील. मोहीम यशस्वी झाल्यास, चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने आणण्याची क्षमता असलेले भारत चौथे राष्ट्र बनेल.

- Advertisement -

इस्रो प्रमुखांनी चांद्रयान-4 बद्दल काय सांगितले?

नुकतेच राष्ट्रीय अंतराळ विज्ञान सेमिनारमध्ये सांगितले की, चांद्रयान-4 मोहिमेचे ध्येय चंद्राच्या पृष्ठभागावरून मातीचे नमुने गोळा करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणे आहे. जेणेकरून. शास्त्रज्ञ त्यांचा अभ्यास करू शकतील. पूर्वीच्या चांद्रयान मोहिमेत 2-3 अंतराळयाने होती, तर चांद्रयान-4 मध्ये पाच असतील.

हे भाग आहेत – प्रोपल्शन मॉड्यूल (मोशन कंट्रोल), डिसेंडर मॉड्यूल (चंद्रावर उतरणे), असेंडर मॉड्यूल (चंद्रावरून परत येणे), ट्रान्सफर मॉड्यूल (एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जाणे) आणि री-एंट्री मॉड्यूल (पृथ्वीवर परत येण्यासाठी)


Edited By- Prajakta Parab 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -