घरदेश-विदेशमोदी, डोवालांवरील दहशतवादी हल्ल्यासाठी जैशचे पथक तयार

मोदी, डोवालांवरील दहशतवादी हल्ल्यासाठी जैशचे पथक तयार

Subscribe

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर हल्ल्याची तयारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केली असल्याची खळबळजनक माहिती गुप्तहेर खात्याला मिळाली आहे. हल्ल्यासाठी जैशने दहशतवाद्यांचे एक पथक तयार केले असून ते पाकिस्तानातून भारतात पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे मोदी आणि डोवाल यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

एका परदेशी गुप्तहेर संघटनेला जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा दहशतवादी शमशेर वाणी आणि त्याचा म्होरक्या यांच्यात झालेल्या संभाषणाची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी भारताला ही माहिती दिली आहे. हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे काम पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचा मेजर दर्जाचा एक अधिकारी करत आहे.

- Advertisement -

तोच या दहशतवाद्यांना नियंत्रण करणार असल्याचेही कळले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागात असलेल्या हवाई तळांवर जैश ए मोहम्मदचे 8 ते 10 दहशतवादी आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. दरम्यान, या माहितीनंतर भारतीय हवाई दलाच्या श्रीनगर, अवंतीपोरा, जम्मू, पठाणकोट, हिंडनसह सर्व मुख्य हवाई तळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांना या हवाई तळावरील सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -