घरदेश-विदेशJapan Ship Found in The Sea : 80 वर्षांनी सापडलेली समुद्रात बुडालेले...

Japan Ship Found in The Sea : 80 वर्षांनी सापडलेली समुद्रात बुडालेले जपानी जहाज

Subscribe

वॉशिंग्टन : पहिल्या महायुद्धानंतर जगातील सर्वात विनाशकारी ठरलेल्या दुसरे महायुद्धाची झळ कमीअधिक प्रमाणात सर्वच देशांना बसली. दुसऱ्या महायुद्धात जपान, जर्मनी, पोलंड, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया हे देश भरडले गेले. 1942मध्ये अमेरिकन पाणबुडीच्या हल्ल्यात जपानच्या एक मोठ्या जहाजाला जलसमाधी मिळाली होती. आता 80 वर्षांनंतर हे जहाज सापडले आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एक हजारांहून अधिक प्रवाशांसह बुडालेले जपानी जहाज अखेर सापडले आहे, असे व्हॉईस ऑफ अमेरिकाच्या वृत्तात म्हटले आहे. एसएस मॉन्टेव्हिडीओ मारू (Japanese SS Montevideo Maru Ship) असे या जपानी जहाजाचे नाव असून जवळपास 80 वर्षांनंतर त्याचे अवशेष सापडले आहेत. जहाजावर जपानी सैनिकांसह सुमारे 1,060 युद्धकैदी होते. जहाज बुडाले तेव्हा सर्वांचा मृत्यू झाला होता. या युद्धकैद्यांपैकी 850 ऑस्ट्रेलियाचे सैनिक होते.

- Advertisement -

या आठवड्याच्या सुरुवातीला या जहाजाचे अवशेष फिलिपिन्सच्या (Philippines) दक्षिण चीन समुद्रात (South China Sea) सापडले. हे ऑस्ट्रेलियन संरक्षण विभाग (Australian Defense Department), ऑस्ट्रेलियाच्या सायलेंटवर्ल्ड फाऊंडेशनचे (Australia’s Silentworld Foundation) सागरी पुरातत्वशास्त्रज्ञ (marine archaeologists) आणि डच खोल समुद्र सर्वेक्षण कंपनी फुग्रोच्या (Dutch deep-sea survey company Fugro) तज्ज्ञांनी शोधले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला फिलिपिन्सच्या किनारपट्टीवर शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.

- Advertisement -

जहाज गेले होते रसातळाला
ऑस्ट्रेलियाची सायलेंटवर्ल्ड फाऊंडेशन गेल्या 12 दिवसांपासून माँटेव्हिडिओ मारूचा शोध घेत होते. जहाजाचे अवशेष सापडले तरी त्यात काहीही बदल केले जाणार नाहीत. तसेच या दुर्घटनाग्रस्त जहाजातील मानवी अवशेष देखील काढले जाणार नाहीत. तब्बल 80 वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर या जहाजाचे अवशेष मिळणे, ही मोठी गोष्ट आहे, कारण हे जहाज टायटॅनिकपेक्षा जास्त खोलवर गेले होते. त्यामुळे या जहाजाचे अवशेष संशोधनासाठी ठेवण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -