घरमुंबई"भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर योग्य वेळी भूमिका घेऊ", शरद पवारांची प्रतिक्रिया

“भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर योग्य वेळी भूमिका घेऊ”, शरद पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई | “ज्यांना फोडाफोडीचे राजकारण करायचे असेल, ते त्यांचे राजकीय डावपेच असतील, तर त्यावर आम्ही योग्य वेळी घेऊ”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपावर दिली आहे. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मागे घेण्यात आलेल्या कृषी कायद्यांवर देखील निशाणा साधला. अमरावती अॅग्रिकल्चर फोरम येथे आज, रविवारी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी कृषी धोरणावरून केंद्र सरकारवर टीका केली.

अमरावतीच्या अॅग्रीकल्चर फोरममध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्याबाबत ठराव झाला. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कसा प्रयत्न कराल? पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “एमएसपी (किमान आधारभूत किंमत) यासंबंधी अधिक वास्तविक धोरण केंद्र सरकारला स्वीकारायला आपण भाग पाडले पाहिजे. यापूर्वी केंद्र सरकारने निवडणुका जाहीर होण्याच्या सहा महिने आधी तीन कृषी कायदे संसदेत मांडले होते आणि हे तीन कृषी कायदे त्यांनी घाईघाईने मंजूर देखील करून घेतले होते. या कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले होते. त्या प्रकारचे कायदे हे उपयोगी नाहीत. त्या कायद्यांत काही बदल करणे गरजेचे होते. या कायद्यांबद्दल आमचे म्हणणे होते की, कायद्यात किमान आधारभूत किंमत देण्याची हमी नव्हती,” असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

- Advertisement -

हेही वाचा – समृद्धी महामार्ग चांगला, पण…; शरद पवार असं का म्हणाले?

पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. या पश्चिम विदर्भात तुम्ही काय विशेष काळजी घेणार आहात? असे विचारले असता, शरद पवार म्हणाले, “धोरण ठरविल्यानंतर येथे अधिक लक्ष केंद्रीत करावे लागेल. विशेषतः वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा येथे अधिक लक्ष द्यावे लागेल. या भागांतील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी करावे लागेल. या शेतकऱ्यांच्या शेतमालाला अधिक किंमत कशी मिळेल याची काळजी घ्यावी लागेल,” असे ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Question by Jitendra Awhad : शांतसंयमी राम आता उग्र का झाला? आव्हाड यांचा सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -