घरताज्या घडामोडीKarnataka Hijab Row-कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धार्मिक पोशाख नको- कर्नाटक हायकोर्ट

Karnataka Hijab Row-कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धार्मिक पोशाख नको- कर्नाटक हायकोर्ट

Subscribe

हिजाब प्रकरणावर कर्नाटक हायकोर्टाने महत्वपू्र्ण निर्देश दिले आहेत. कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पोषाख घालणे टाळावे असे न्यायालयाने म्हटले असून कॉलेज सुरू करण्याचे निर्देश कॉलेज प्रशासनाला दिले आहेत. सोमवारी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

कर्नाटकमधील हिजाब प्रकरणावरून सध्या देशभरात तणावाचे वातावरण आहे. कर्नाटक सरकारने शाळा कॉलेजमध्ये गणवेश परिधान करणे अनिर्वाय केले आहे. मात्र यास मुस्लीम विद्यार्थीनींनी नकार दिला असून हिजाब ही आमची धार्मिक परंपरा असल्याचे म्हटले आहे. यावरून कर्नाटकमध्ये वाद निर्माण झाला आहे. मंगळवारी एका हिजाब घातलेल्या विद्यार्थानीला भगवे स्कार्फ आणि टोपी घातलेल्या जमावाने जय श्रीरामच्या घोषणा देत घेरले होते. त्यावेळी जमावाला न घाबरता मुलीनेही अल्ला हू अकबरचा नारा दिला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. तर हिजाब घालण्यास बंदी घातल्याने मु्स्लीम विद्यार्थीनींनी या निर्णयाला कर्नाटक हायकोर्टात आव्हान दिले आहे. यावर आज सुनावणी  होती. त्यात न्यायालयाने सोमवारी याप्रकरणाची पुढील सुनावणी होईल असे सांगताना सध्या विद्यार्थ्यांनी धार्मिक पोषाख घालून कॉलेजमध्ये येऊ नये असे निर्देश दिले आहेत. तसेच हिजाब वादामुळे तीन दिवस बंद ठेवण्यात आलेले शाळा कॉलेजेस सुरू करण्याचा सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -