घरदेश-विदेशचेहरा झाकला जाईल अशा पेहरावावर बंदी; केरळ मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचा निर्णय

चेहरा झाकला जाईल अशा पेहरावावर बंदी; केरळ मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचा निर्णय

Subscribe

श्रीलंकेत झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेच्या सरकारने बुरखा बंदी घातली आहे. अशा निर्णयानंतर भारतात ही मागणी

श्रीलंकेमध्ये बुरख्यावर बंदी घातल्यानंतर संपुर्ण भारतभर याविषयी वादविवाद सुरू झाले आहेत. श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर तेथे बुरख्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे भारतातही बुरख्यावर बंदीबाबत वादविवाद सुरू झाले असताना केरळमध्ये मुस्लिम एज्युकेशन सोसायटीकडून आपल्या शाळा आणि महाविद्यालयात चेहरा झाकला जाईल अशा पेहरावावर बंदी घालण्यात आली आहे. या बुरखा बंदीमुळे मोठा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यातील कालिकत येथे असणाऱ्या स्लिम एज्युकेशन सोसायटीने १७ एप्रिलपासूनच याचे एक पत्रक जाहीर करून या संस्थेच्या सर्वच शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात चेहरा झाकला जाईल, असा पेहराव परिधान करण्यास बंदी घातली आहे. दरम्यान, केरळमधील काही संघटनानी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

- Advertisement -

श्रीलंकेत झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेच्या सरकारने बुरखा बंदी घातली आहे. अशा निर्णयानंतर भारतात ही अशी मागणी करण्यात येत असून त्याला विरोधही होत आहे. नुकतेच ‘सामना’ या मुखपत्रातील संपादकीयमधून बुरखा आणि नकाबबंदीची मागणी केली होती. मात्र, नंतर ही वर्तमानपत्राची व्यक्तिगत भूमिका असल्याचे शिवसेनेकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -