घरदेश-विदेशलेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची भारताच्या नव्या लष्करप्रमुखपदी नियुक्ती

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची भारताच्या नव्या लष्करप्रमुखपदी नियुक्ती

Subscribe

सध्याचे लष्कराचे प्रमुख जनरल एम.एम. नरवणे हे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. त्यांच्या 28 महिन्यांचा कार्यकाळ 30 एप्रिल रोजी पूर्ण होत आहे.

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची भारताच्या लष्कर प्रमुख पदी नियुक्त करण्यात आली आहे. सध्याचे लष्कराचे प्रमुख जनरल एम.एम. नरवणे हे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. त्यांच्या 28 महिन्यांचा कार्यकाळ 30 एप्रिल रोजी पूर्ण होत आहे. त्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची पुढील लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. भारताचे 29 वे लष्कर प्रमुख म्हणून ते कार्यभार सांभाळणार आहेत.

जनरल पांडे हे लष्कर प्रमुख बनणारे कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सचे पहिले अधिकारी असतील. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) कोण असेल यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अंतिम सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर हे पद रिक्त आहे.

- Advertisement -

मनोज पांडे यांची डिसेंबर 1982 मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्समध्ये नियुक्त करण्यात आली होती. तसेच त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ पल्लनवाला सेक्टरमध्ये ऑपरेशन पराक्रम दरम्यान इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्त्व केले. याशिवाय 39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत जनरल पांडे यांनी वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, एलओसीवर पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्त्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकरण्याआधी ते अंदमान आणि निकोबार कमांडरचे कमांडर-इन-चीफ म्हणून कार्यभार सांभाळत होते.

- Advertisement -

जनरल मनोज पांडे यांनी स्टाफ कॉलेज, कॅम्बर्ली (युनायटेड किंगडम) येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तसेच, हायर कमांड (एचसी) आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज (एनडीसी) कोर्सेसमध्ये भाग घेतला. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी लेफ्टनंट जनरल मोहंती यांच्याकडून लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला जे 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -