घरदेश-विदेशLok Sabha 2024: UK मध्ये सर्जरी, तो आंधळाही होऊ शकतो...; राघव चढ्ढाबाबत...

Lok Sabha 2024: UK मध्ये सर्जरी, तो आंधळाही होऊ शकतो…; राघव चढ्ढाबाबत मोठी बातमी समोर

Subscribe

राघव चढ्ढा यांना डोळ्यांच्या गंभीर समस्येमुळे लंडनला जावे लागले, असे उत्तर आप आमदार सौरभ भारद्वाज यांनी दिले. डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी ते तिथे गेले आहेत, या शस्त्रक्रियेला जर का उशीर झाला असता तर कदाचित त्यांची दृष्टी गेली असती असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा सध्या लंडनमध्ये असून त्यांच्या डोळ्यांवर उपचार सुरू आहेत. मात्र, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. केजरीवाल यांच्या घरावर ईडीचा छापा, त्यानंतर झालेली अटक आणि नंतर तुरुंगवास या वेळी आपचे खासदार राघव चढ्ढा एकदाही दिसले नसल्याची चर्चा अधिक आहे. (Lok Sabha Election 2024 Raghav Chadha surgery was done in UK his eyesight could have been lost )

दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनाही आज हाच प्रश्न विचारण्यात आला. राघव चढ्ढा यांना डोळ्यांच्या गंभीर समस्येमुळे लंडनला जावे लागले, असे उत्तर आप आमदार सौरभ भारद्वाज यांनी दिले. डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी ते तिथे गेले आहेत, या शस्त्रक्रियेला जर का उशीर झाला असता तर कदाचित त्यांची दृष्टी गेली असती असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

पत्रकार परिषदेत बोलताना भारद्वाज म्हणाले, ‘राधव चढ्ढा हे यूकेमध्ये आहेत. त्यांना रेटिनल डिटेचमेंटचे झालं आहे आणि मला सांगण्यात आले की ते गंभीर आहे. त्यांनी अजून उशीर केला असता तर आपली दृष्टी गेली गमावली असती. निवडणूक प्रचारादरम्यान राघव चढ्ढा यांची अनुपस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना भारद्वाज म्हणाले, ‘ते उपचारासाठी लंडनला गेले आहेत. माझ्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत. तो लवकरच बरा होऊन प्रचारात सहभागी होईल, असंही भारद्वाज यांनी सांगितलं.

राघव चढ्ढा वादात सापडले होते

राघव चढ्ढा यांचा गेल्या महिन्यात ब्रिटनचा दौरा वादात सापडला होता. त्यांनी ब्रिटीश खासदार प्रीत के गिल यांची भेट घेतली होती, जे सोशल मीडियावर खलिस्तान फुटीरतावाद आणि भारतविरोधी भावनांच्या समर्थनासाठी ओळखले जातात. त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती पण सध्या ती केवळ अफवा आहे. राघव चढ्ढा यांची पत्नी आणि अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत गेला होता. पत्नी परिणीती पुन्हा भारतात परतली होती, मात्र राघव उपचाराअभावी तिथेच थांबला होता.

- Advertisement -

रेटिनल डिटेचमेंट म्हणजे काय ?

रेटिनल डिटेचमेंट ही डोळ्याची गंभीर आणि आपत्कालीन समस्या मानली जाते. यामध्ये डोळ्याच्या मागील बाजूस असलेला ऊतींचा पातळ थर (रेटिना) त्याच्या सामान्य स्थितीपासून दूर जातो. रेटिनल डिटेचमेंटमध्ये, रेटिनल पेशी रक्तवाहिन्यांच्या थरापासून विभक्त होतात ज्यामुळे डोळ्यांना ऑक्सिजन आणि पोषण मिळते.

जर रेटिनल डिटेचमेंटवर बराच काळ उपचार न केल्यास प्रभावित डोळ्यातील कायमस्वरूपी दृष्टी नष्ट होण्याचा धोका वाढतो. वयाच्या 50 व्या वर्षी ही समस्या अधिक सामान्य आहे, परंतु तरुण लोकांमध्येही ही समस्या उद्भवते.

(हेही वाचा: Lok Sabha 2024: भाजपा उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारफेरीवर दगडफेक)


Edited By- Prajakta Parab 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -