घरदेश-विदेशए आर रहमानच्या शिष्याने मिळवले अमेरिकेत ७ कोटींचे बक्षीस

ए आर रहमानच्या शिष्याने मिळवले अमेरिकेत ७ कोटींचे बक्षीस

Subscribe

प्रसिद्ध संगितकार ए आर रहमानचा शिष्य असलेल्या चेन्नईतील एका १३ वर्षीय मुलाने अमेरिकेत द वर्ल्डस बेस्ट किताब पटकावला आहे.

अमेरिकेतील ‘द वर्ल्डस बेस्ट’ या रिअॅलिटी शोच्या किताबावर चेन्नईच्या १३ वर्षीय लिडियन नादस्वरम या मुलाने नाव कोरले आहे. लिडियन हा पियानो वादक आहे. त्याला पुरस्कार स्वरुप १ मिलियन डॉलर म्हणजेच ७ करोड रुपयांचे बक्षिस मिळाले आहे. त्याने हा पुरस्कार मिळवुन संपूर्ण जगभरात देशाचे नाव उंचावले आहे. त्याच बरोबर लिडियान हा संगीतकार ए आर रहमान याचा शिष्य असल्याने जगभरातून रहमानवर देखील कौतुकाचा वर्षाव होत आहे.

एका वेळी वाजवतो दोन पियानो

लिडियन दररोज दिवसातून ५ ते ६ तास पियानो वाजवण्याचा सराव करतो, असे त्याने स्पर्धे दरम्यान सांगीतले. ४ वर्षांपूर्वीच त्याने पियानो वाजवायला सुरवात केली. मुख्य म्हणजे त्याने एकाच वेळी दोन पियानो वाजवण्याची कला आत्मसाद केली आहे. त्यातही दोन्ही पियानोवर तो एकाच वेळी दोन वेगवेगळी गाणे वाजवतो हे विशेष. या स्पर्धेमध्ये आपली कला सादर करण्याची संधी दिल्या बद्दल त्याने अमेरिकेचे आभार मानले आहेत. या स्पर्धमुळे जगभरातील कलाकारांना भेटण्याची संधी मिळाल्याचे देखील त्याने सांगितले.

- Advertisement -

चंद्रावर पियानो वाजवण्याची इच्छा

दरम्यान, लिडियनने चंद्रावर जाऊन बिथोवन यांची मूनलाइट सोनाटाची धून वाजवण्याची इच्छा बोलुन दाखवली आहे.
‘द वर्ल्डस बेस्ट’ स्पर्धा जिंकल्या नंतर लिडियनने ‘द एलन’ शोमध्ये भाग घेतला आहे. लिडियन नाधस्वरमचे वडील देखील संगीतकार आहेत. त्यामुळे आपल्या वडिलांकडूनच त्याला संगीताची प्रेरणा मिळाली आहे.

- Advertisement -

लिडियन याने द वर्ल्डस बेस्ट या रिअॅलिटी शोमध्ये चक्क डोळ्यावर पट्टी बांधत पियानो वाजवण्याचा पराक्रम केला आहे. या संबंधीत त्या कार्यक्रमा दरम्यानचा, व्हिडिओ त्याने फेसबुकवरुन शेअर केला आहे. त्याच्या या पराक्रमाने उपस्थित लोक देखील त्याला डोळ्यावर पट्टी बांधुन पियानो वाजवताना बघुन आश्चर्य चकीत होतात. विशेष म्हणजे लिडियान केवळ १३ वर्षांचा असून तो प्रसिद्ध संगितकार ए आर रहमान याचा शिष्य आहे. रहमानच्या चेन्नई मधील केएम म्यूजिक कंजर्वेटरी या संगीत विद्यालयात तो पियानो वादन आणि संगीताचे शिक्षण घेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -