घरदेश-विदेशभाजप नेते म्हणतायेत 'मै भी चौकीदार'!

भाजप नेते म्हणतायेत ‘मै भी चौकीदार’!

Subscribe

दोन दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ पोस्ट करून या मोहिमेमध्ये सहभागी होण्यास आवाहन केले होते. ट्विटर अकाऊॅंटवर नाव बदलल्यानंतर सगळ्याच नेत्यांनी ट्विटरवर 'मैं भी चौकीदार' हॅशटॅगसोबत ट्वीट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर आपले नाव बदलून चौकीदार नरेंद्र मोदी असे केले आहे. मोदींशिवाय भाजप मधील नेत्यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊॅंटच्या नावापुढे चौकीदार लिहील्याचे दिसले. यामध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, आरोग्य मंत्री जेपी नड्डा यासोबतच बऱ्याच नेत्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार असे लिहीले आहे. ज्या मंत्र्यांनी आपली नावे बदलली आहेत, त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊॅंटवरून आपल्या ध्येया बद्दल अधिक माहिती दिली आहे.

- Advertisement -

ही माहिती देतांना नेत्यांनी ‘मैं भी चौकीदार’आणि ‘चौकीदार फिर से’ असे हॅशटॅगसोबत अशी पोस्ट केली आहे. दोन दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ पोस्ट करून या मोहिमेमध्ये सहभागी होण्यास आवाहन केले होते. ट्विटर अकाऊॅंटवर नाव बदलल्यानंतर सगळ्याच नेत्यांनी ट्विटरवर मैं ‘भी चौकीदार’ हॅशटॅगसोबत ट्वीट केले.

मैं भी चौकीदार ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये..

१५ मार्च रोजी मोदींनी ट्विटर अकाऊॅंटवर एक व्हिडीओ शेअर करून ‘मैं भी चौकीदार’अशी मोहीमेस सुरूवात केली होती. या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजना, भ्रष्टाचारास आळा बसावा यासोबतच देशाची सुरक्षितता वाढावी याकरिता माहिती दिली होती. या व्हिडिओच्या आाखेरीस ३१ मार्चला संध्याकाळी ६ वाजता मोदींसोबत जोडण्याचे आवाहन देखील केले आहे. यासोबत मोदींनी असे ही सांगितले की, जो व्यक्ती भ्रष्टाचार विरोधात लढत आहे, तोच चौकीदार आहे.

- Advertisement -

‘चौकीदार चोर हैं’ला प्रत्युत्तर 

‘चौकीदार चोर हैं’ याच्या आधारे काँग्रेसने काही महिन्यांमध्ये भाजपावर आरोप केले होते. आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही आपल्या प्रचारास सुरूवात केली. ‘चौकीदार चौर हैं’ ला जशास तसे प्रत्युत्तर म्हणून भाजपने ‘मैं भी चौकीदार’अशी मोहीम सुरू केली आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या मोहिमेला आपल्या ट्विटर अकाऊॅंटवरून सुरुवात केली. ‘मैं भी चौकीदार’ या मोहीमेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींंसह भाजप नेत्यांनी देखील आपला पाठिंबा दर्शविल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्र्यांचाही पाठिंबा

महाराष्ट्रासह इतर भाजप नेत्यांमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री त्रिवेंद सिंह रावत, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास, भाजप पक्षाचे प्रवक्ता मुख्तार अब्बास नकवी, संबित पात्रा, छत्तीसगढ़ मधील पूर्व मुख्यमंत्री रमन सिंह, यशवंत सिंह यांचा मुलगा आणि मीनाक्षी लेखींचा देखील सहभाग घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -