घरदेश-विदेशMamata Banerjee Car Accident: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गाडीचा अपघात; किरकोळ...

Mamata Banerjee Car Accident: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गाडीचा अपघात; किरकोळ जखमी 

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जींचा बुधवारी (24 जानेवारी) कार अपघात झाला या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत.

Mamata Banerjee Car Accident: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जींचा बुधवारी (24 जानेवारी) कार अपघात झाला या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. (Mamata Banerjee Car Accident West Bengal Chief Minister Mamata Banerjee s car accident Minor injuries)

ममता बॅनर्जी यांची गाडी दुसऱ्या वाहनाला धडकू नये म्हणून अचानक थांबवण्यात आली आणि त्यामुळेच हा अपघात झाला. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वर्धमानहून कोलकाता येथे परतत असताना हा अपघात झाला. अचानक बॅनर्जींच्या ताफ्यासमोर दुसरी कार आली आणि त्यांच्या गाडीने एमर्जंसी ब्रेक दाबला आणि त्यामुळे हा अपघात झाला आहे.

- Advertisement -

काँग्रेसची प्रतिक्रिया काय?

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, ममता बॅनर्जी कार अपघातात जखमी झाल्याची बातमी आम्ही नुकतीच ऐकली. त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशा शुभेच्छा देतो. ते पुढे म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रा गुरुवारी (25 जानेवारी) सकाळी पश्चिम बंगालमध्ये दाखल होईल.

- Advertisement -

यापूर्वीही ममता बॅनर्जी यांचा अपघात झाला होता

गेल्या वर्षी जूनमध्ये ममता बॅनर्जी या अपघातामुळे जखमी झाल्या होत्या. पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी जलपायगुडीतील निवडणूक रॅलीनंतर बागडोगरा विमानतळावर जात होत्या. यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे बैकुंठपूरच्या जंगलाजवळ पोहोचले. यानंतर हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आणि यादरम्यान ममता बॅनर्जी यांच्या डाव्या गुडघ्याच्या लिगामेंटला दुखापत झाली होती.

(हेही वाचा INDIA: ममतांशिवाय युतीची कल्पनाच करू शकत नाही; काँग्रेसची सारवासारव )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -