घरदेश-विदेशकांदे विकत घेण्यासाठी रांगेत उभा असलेल्या व्यक्तिचा मृत्यू

कांदे विकत घेण्यासाठी रांगेत उभा असलेल्या व्यक्तिचा मृत्यू

Subscribe

आंध्र प्रदेशच्या क्रिष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदे विकत घेण्यासाठी रांगेत उभे असलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. वाढलेल्या कांद्याच्या दरामुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी अनुदानित कांदा विकत घेण्याचा उपक्रम राबविला होता. २५ रुपये किलोने कांदा मिळत असल्यामुळे अनेकांची कांदा विकत घेणयासाठी झुंबड उडाली होती. सम्बया असे निधन पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कांदा विकत घेण्यासाठी सम्बया रांगेत उभे असताना अचानक खाली कोसळून त्यांचा मृत्यू झाला.

रांगते उभे असताना खाली कोसळल्यानंतर लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवले. सम्बया यांचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या विषयावर आता आंध्र प्रदेशमध्ये राजकारण पेटू लागले आहे. तेलगू देसम पक्षाने हा विषय विधानसभेत उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र वायएसआर सरकारने हा प्रश्न उपस्थित करु दिला नाही.

- Advertisement -

सत्तेतून पायउतार झालेले तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले आहे. राज्य सरकार यावर स्पष्टीकरण का देत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकारला जाब विचारला आहे. तसेच सरकारच्या योजना लोकांपर्यंत नेण्यासाठी ग्रामीण भागातील स्वंयसेवक का नेमले गेले आहेत. मात्र कांदा लोकांना देण्यात या स्वयंसेवकांना अपयश आलेले आहे, याचाही जाब चंद्राबाबू नायडू यांनी विचारला आहे. आंध्र प्रदेशमध्ये सध्या कांद्याला किलोमागे ११० ते १६० रुपये दर सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -