घरदेश-विदेशलघुशंकेसाठी खाली उतरला अन् चोर गाडी घेऊन पळाला

लघुशंकेसाठी खाली उतरला अन् चोर गाडी घेऊन पळाला

Subscribe

अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

नोएडा येथे एका बीएमडब्ल्यू कारची चोरी करण्यात आली आहे. मात्र, ही चोरी अशावेळी करण्यात आली की, तुम्हाला समजले तर तुम्हालाही धक्का बसेल. बीएमडब्ल्यूचा मालक लघुशंका करण्यासाठी गाडी रस्त्याच्या बाजूला लावून लघुशंका करत होता. त्याचवेळी अज्ञात चोर त्यांची बीएमडब्ल्यू गाडी घेऊन पळाला. सेक्टर ९० फेज-२ पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. बीएमडब्ल्यूचा मालक हा दारुच्या नशेत होता.

स्टॉक ब्रोकर रिषभ अरोरा हे एका पार्टीतून घरी जात असताना ही घटना घडली. या लक्झरी कारची मालकी अरोराच्या मेहुण्याकडे आहे आणि त्या वाहनावर ४० लाख रुपयांचे कर्ज बाकी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – औरंगाबादमध्ये निर्घूण हत्या, तरुणाचं मुंडकं तलवारीनं छाटलं!

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस घटनास्थळी पोहचले. अरोराने गाडी थांबवली होती आणि लघुशंकेसाठी बाहेर आले होते. दरम्यान, काही अज्ञात इसम घटनास्थळी पोहोचले आणि वाहन घेऊन पळून गेले, अशी माहिती मध्यवर्ती नोएडाचे पोलिस उपायुक्त हरीश चंदर यांनी दिली.

गाडीच्या मालकाला ओळखत असलेल्या एखाद्याने ही दरोड्याची योजना आखली होती, असे डीसीपी म्हणाले. अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -