घरताज्या घडामोडीकरोनामुळे ५ कोटी नोकऱ्यांवर टांगती तलवार, पर्यंटन क्षेत्रावर बेरोजगारीचे सावट

करोनामुळे ५ कोटी नोकऱ्यांवर टांगती तलवार, पर्यंटन क्षेत्रावर बेरोजगारीचे सावट

Subscribe

करोना व्हायरसच्या महामारीने संपूर्ण जगात लॉकडाऊन सुरू असून नागरिकांना देशाबाहेर जाण्यास व पर्यटकांना दुसऱ्या देशांमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अनेक शहरात विमानसेवाही बंद करण्यात आली आहे. करोनाच्या संसर्गाला घाबरून लोकांनी घराबाहेर पडणेही बंद केले आहे. यामुळे परिषदा, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, खेळ व समिटसही रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे पर्यंटनक्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला असून पर्यंटकच नसल्याने कंपन्यानीही शटर डाऊन करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे जगभऱातील ५ कोटी नोकऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार लटकली आहे. अशी शक्यता ‘द वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टूरिझम काऊन्सिल इंडस्ट्री’ WTTC ने व्यक्त केली आहे.

शेकडो विमान विमानतळावर उभी असून एक डझनाहून अधिक व्यापारी जहाजही समु्द्रात ताटकळत उभे आहेत. करोनाच्या भितीने कंपन्याच बंद ठेवण्यात आल्याने कामच नसल्याने कार्यलयेही बंद आहेत. त्यामुळे कामच नसल्याने रोंजंदारीवर जगणारे हजारो लोक बेरोजगार झाले आहेत.

- Advertisement -

करोनाचा फैलाव ज्याप्रकारे होत आहे ते पाहता WTTC चे व्यवस्थापिकीय संचालक वर्जिनिया मेसिना यांनीही करोनामुळे पर्यंटन क्षेत्राचे अतोनात नुकसान होत असल्याचे म्हटले आहे. यावर्षाच्या पर्यंटन क्षेत्राशी संबंधित २५ टक्के बुकिंग्ज रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे जगातील पर्यंटनक्षेत्रात काम करणाऱ्या १६ टक्के कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. यामुळे करोना व्हायरसमुळे ५ कोटी लोक बेरोजगार होणार आहेत.  WTTC ने हे अनुमान २०१८ सालच्या जागतिक पर्यंटन उद्योगक्षेत्राबरोबर तुलना करून जाहीर केले आहे. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी संपूर्ण देशात ३१९ मिलियन म्हणजे ३१.० कोटी लोक पर्यंटनक्षेत्रात काम करत होते. त्यातही ज्या पर्यंटन कंपन्या चीनबरोबर काम करत आहेत त्यांना सर्वाधिक फटका बसल्याचे मेसिना यांनी म्हटले आहे. तसेच व्यापारी जहाजांवर काम करणाऱ्या कंपन्यानाही हा फटका बसणार आहे. करोना व्हायरसमुळे पर्यंटन क्षेत्राला ९० टक्के नुकसान होणार असून परिस्थिती पू्र्वपदावर येण्यासाठी १० ते १२ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. असेही WTTC ने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -