घरदेश-विदेशManipur Violence : गृहमंत्र्यांनी संसदेत सांगितलं हिसाचाराचं खरं कारण; म्हणाले...

Manipur Violence : गृहमंत्र्यांनी संसदेत सांगितलं हिसाचाराचं खरं कारण; म्हणाले…

Subscribe

Manipur Violence : मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचाराच्या (Manipur Violence)  घटना सुरू आहेत. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर मुद्दावर संसदेत भाष्य करावं, असा विरोधकांनी मागणी केली होती. या प्रकरणी बोलताना गृहमंत्री अमित शाहा (Home Minister Amit Shah) यांनी मणिपूर हिंसाचारे खरे कारण सांगितले आहे. (Manipur Violence The Home Minister told the real reason for violence in Parliament said)

अमित शाहा म्हणाले की, गेल्या काही दिवासांपासून देशातील जनतेसमोर एक गैरसमज पसरवला जात आहे की, हे सरकार मणिपूरवर चर्चा करायला तयार नाही. परंतु मी पहिल्या दिवसापासून मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार होतो, मात्र विरोधकांना कधीही चर्चा करायची नव्हती. यांना वाटतं की आवाज करून मला गप्प करू शकता. पण तुम्ही मला गप्प करू शकत नाही, कारण 130 कोटी लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे तुम्हाला आमचे ऐकावे लागेल. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मी सभापतींना पत्र लिहून मणिपूरवर चर्चा करण्याची विनंती केली होती. हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे, असे अमित शाहा यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. तसेच ते म्हणाले की, माझ्या बोलण्यावर तुमचं समाधान झालं नाही झालं तर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे उत्तर मागू शकता. तुम्ही देशाच्या गृहमंत्र्यांना मणिपूरच्या मुद्द्यावर बोलू देत नाही, ही कसली लोकशाही आहे? असा प्रश्न अमित शाहा यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – सुप्रिया सुळेंच्या आरोपांना अमित शहांचे प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्रात पहिले सरकार कोणी पाडले?

अमित शाहा म्हणाले की, मणिपूरमध्ये भाजपच्या सहा वर्षांच्या कारकिर्दीत एकही दिवस हिंसाचार झालेला नाही किंवा कोणत्याही हिंसक घटना घडल्या नाहीत. हा आमचा सहा वर्षांचा अनुभव होता. परंतु म्यानमारमध्ये लष्करी राजवट लागू झाली आणि तेथील कुकी समाजाची धरपकड सुरू झाली. त्यामुळे तेथून मोठ्या संख्येने कुकी आदिवासी मिझोराम आणि मणिपूरमध्ये येऊ लागले. ते जंगलात स्थायिक होऊ लागले. यानंतर उर्वरित मणिपूरमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यानंतर आम्ही सीमा बंद करण्याचे काम केले. 10 किलोमीटरच्या सीमेवर आम्ही कुंपण केले आहे. 7 किलोमीटरचे काम सुरू असून 600 किमीचे सर्वेक्षण सुरू आहे. हे काम काँग्रेसने कधीच केले नाही, असे म्हणते त्यांनी चिमटा काढण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

मणिपूरमध्ये हिंसाचार कसा सुरू झाला?

आम्ही 2023 च्या सुरूवातील स्थलांतरित लोकांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅन करून त्यांचे नाव मतदार यादीत आणि आधार कार्ड यादीत टाकण्याचे काम केले. परंतु स्थलांतरित होऊन आलेल्या लोकांमुळे मणिपूरच्या लोकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली होती. दरम्यान, 29 एप्रिल रोजी स्थलांतरित होऊन आलेल्या लोकांची वसाहत गाव म्हणून घोषित केल्याची अफवा पसरली. ही अफवा थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. पण एप्रिल महिन्यात मणिपूर उच्च न्यायालयाच्या निर्णयाने आगीत तेल ओतण्याचे काम केले. त्यामुळे मैतेईने आदिवासी म्हणून घोषित करावे, अशी मागणी केल्याचे अमित शाहा यांनी सांगितले.

हेही वाचा – No Confidence Motion : अमित शाह कडाडले; भ्रष्ट आम्ही नाही तर, कॉंग्रेस पक्ष भ्रष्टाचाराने माखलेला

महिलांसोबत झालेला अवमान समाजावरचा कलंक

महिलांसोबत झालेल्या अवमानाचा व्हिडिओ व्हायरल प्रकरणी बोलताना अमित शाहा म्हणाले की, कोणीतरी प्रश्न केला की, संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी महिलेच्या अवमानाचा व्हिडिओ समोर का आला? यावर बोलताना अमित शाहा म्हणाले की, कोणाकडे व्हिडीओ असेल तर त्याने तो पोलीस यंत्रणेला किंवा संसदेला द्यायला हवा होता? तो व्हिडीओ सार्वजनिक करण्याची काय गरज होती? महिलांच्या सन्मानाची काळजी करायला हवी होती? 4 तारखेच्या घटनेचा व्हिडिओ होता. तो सार्वजनिक करण्याऐवजी डीजीपीकडे पाठवला असता तर, 5 तारखेलाच कारवाई झाली असती, असेही अमित शाहा म्हणाले.

राहुल गांधींच्या मणिपूर दौऱ्यावर शाहांनी साधला निशाणा

राहुल गांधींच्या मणिपूर दौऱ्यावर बोलताना अमित शाहा म्हणाले की, मणिपूरला जाणे त्यांच्यासाठी चांगले आहे. प्रत्येकाला संवेदनशीलता आहे, पण त्यांची भेट निव्वळ राजकीय होती. मणिपूर हिंसाचार आता आटोक्यात आला आहे, पण लोकांनी आगीत तेल टाकू नये, असा इशारा अमित शाहा यांनी दिला. ते म्हणाले की, राहुल गांधींच्या दौऱ्यात त्यांनी चुरचंदपूरला रस्त्याने जाण्याचा आग्रह धरला होता, पण आम्ही त्यांच्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. संपूर्ण नाटक देशाने टीव्हीवर पाहिले आहे. ते दुसऱ्या दिवशी हेलिकॉप्टर वापरायला गेले. ते असे आधी करू शकले असते, पण त्यांनी त्याचा निषेध दाखवायचा होता. संकटकाळात असे राजकारण करणे योग्य नाही, असेही अमित शाहा म्हणाले.

हेही वाचा – 137 दिवसांनंतर लोकसभेत, 36 मिनिट बोलले; राहुल गांधींच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे

मैतेई आणि कुकी समुदायांना संवादात सामील होण्याचे आवाहन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरमधील हिंसाचाराची कारणे आणि राज्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांची संपूर्ण माहिती दिली. यानंतर त्यांनी मेईतेई आणि कुकी या दोन्ही समुदायांना संवाद साधण्याचे आवाहन केले. हिंसाचार हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही. मी तुम्हाला आश्वासन देतो की, आम्ही राज्यात शांतता प्रस्थापित करू. या मुद्द्यावर राजकारण करू नये. तसेच मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांना हटवण्याच्या मागणीवर अमित शाह म्हणाले की, जेव्हा एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री सहकार्य करत नाहीत, तेव्हा त्यांना बदलले पाहिजे. हे मुख्यमंत्री केंद्राला सहकार्य करत आहेत, असेही अमित शाहा म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -