घरदेश-विदेशतामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनच्या नेतृत्वात पार पडली विरोधी पक्षनेत्यांची बैठक

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनच्या नेतृत्वात पार पडली विरोधी पक्षनेत्यांची बैठक

Subscribe

सामाजिक न्याय, मागासलेल्या आणि दुर्बल घटकांच्या विकासासाठी सर्वांना एकत्र यायला हवे, असे सांगून अनेक प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

काल सोमवारी (ता. ०३ एप्रिल) दिल्लीत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Tamil Nadu CM MK Stalin) यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांचे अनेक नेते एकत्र आले. एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक न्याय विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत विरोधी पक्षनेते सहभागी झालेले पाहायला मिळाले. स्टॅलिन यांची संघटना ऑल इंडिया फेडरेशन फॉर सोशल जस्टिस येथे सामाजिक न्यायावर पहिले राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या परिषदेला विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी संबोधित केले. स्टॅलिनसह अनेक नेत्यांनी या कार्यक्रमात आपले म्हणणे देखील मांडले.

विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र यावे आणि जात जनगणनेबाबत मांडण्यात आली बाजू
सामाजिक न्याय, मागासलेल्या आणि दुर्बल घटकांच्या विकासासाठी सर्वांना एकत्र यायला हवे, असे सांगून अनेक प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात विरोधी एकजुटीचा पुरस्कार केला. देशात जातीय जनगणना झाली पाहिजे. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डेरेक ओब्रायन यांनी या परिषदेत विरोधी एकजुटीचा पुरस्कार केला आणि सांगितले की, असे दोन-तीन राजकीय पक्ष आहेत ज्यांना भाजपसोबत लढायचे नाही. मी बिजू जनता दलाचे नवीन पटनायक आणि वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांना एकत्र येण्याचे आवाहन करेन की त्यांनी विरोधी पक्षांची साथ द्यावी, ही वेळ स्पष्ट भूमिका घेण्याची आहे.

- Advertisement -

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील नेत्यांच्या एकजुटीचे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव उपस्थित होते. याशिवाय सीपीआयचे सरचिटणीस सीताराम येचुरी, सीपीआयचे सरचिटणीस डी राजा, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला, छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेतेही या कार्यक्रमात सहभागी झालेले पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे, तीन प्रमुख पक्ष – टीएमसी, आप आणि बीआरएस, जे पूर्वी काँग्रेससोबत येण्यास तयार नव्हते, त्यांनीही त्यांच्या प्रतिनिधींद्वारे या बैठकीत सहभाग घेतला. या परिषदेत टीएमसीच्या वतीने खासदार डेरेक ओब्रायन सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह आणि बीआरएसचे खासदार डॉ. केशव राव या परिषदेत सहभागी झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – देशभरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या; मुंबई उच्च न्यायालयात ‘ही’ याचिका दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -