घरताज्या घडामोडीएलॉन मस्कने बदलला ट्वीटरचा लोगो; 'Doge' सोडल्याने युझर्स हैराण

एलॉन मस्कने बदलला ट्वीटरचा लोगो; ‘Doge’ सोडल्याने युझर्स हैराण

Subscribe

ट्विटरचे मालकी हक्क हाती घेतल्यापासून एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरमध्ये (Twitter) अनेक बदल घडवल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच आणखी एक बदल आगामी काळाता एलॉन मस्कने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्विटरचे मालकी हक्क हाती घेतल्यापासून एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरमध्ये (Twitter) अनेक बदल घडवल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच आणखी एक बदल आगामी काळाता एलॉन मस्कने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे एलॉन मस्कचा हा निर्णय ट्विटरच्या युझर्सना हैराण करणार आहे. कारण एलॉन मस्कने ट्विटरचा लोगो चेंज केला आहे. एलॉन मस्क यांनी थेट ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड (Blue Bird Logo) हटवला आहे. त्याजागी आता ‘Doge’ चा फोटो दिसत आहे. (Twitter Logo Has Been Replaced With An Image Of A Doge VVP96)

सोमवारी पहाटेपासून ट्विटरच्या लोगोमधील बदल सर्व युझर्स पाहायला मिळत आहे. लोगोमध्ये अचानक Doge दिसल्याने युजर्सना हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. सध्यस्थितीत हा बदल केवळ ट्विटरच्या वेब पेजवर आहे. त्यामुळे ट्विटरच्या युझर्सना मोबाईल अॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे. ट्विटरचे होम बटण म्हणून दिसणार्‍या ब्लू बर्डऐवजी आता युजर्सना डॉगेचे चित्र दिसत आहे आणि हा बदल काही तासांपूर्वीच झाला आहे.

- Advertisement -

एलॉन मस्कचे मजेशीर ट्वीट

ट्विटरचा आयकॉनिक लोगो बदलल्यानंतर एलॉन मस्क यांनी एक मजेशीर पोस्टही ट्विटरवर शेअर केली आहे. त्यानुसार त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर डॉगे मीम शेअर करत एक मजेशीर ट्वीटही शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स तपासणाऱ्या एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याने ट्विटरच्या ब्लू-बर्डचे आयडी कार्ड हातात धरले आहे. तर कारमध्ये एक Doge बसला आहे. तो त्या ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याला सांगतोय की, “ड्रायव्हिंग लायसन्सवर असलेला फोटो जुना आहे”.

- Advertisement -

एलॉन मस्कने शेअर केला जुन्या पोस्टचा स्क्रीनशॉट

याशिवाय, एलॉन मस्क याने त्यांच्या अकाऊंटवर एका जुन्या पोस्टचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. ज्यामध्ये ते एका अज्ञात अकाउंटशी चर्चा करत आहेत. यामध्ये ती व्यक्ती मस्क यांना ट्विटरच्या बर्ड लोगोच्या जागी Doge Image लावण्यास सांगत आहे. काही वेळापूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये ही पोस्ट शेअर करताना एलॉन मस्क यांनी लिहिलं आहे की, ‘As promised’ म्हणजेच, जे वचन दिले ते मी पूर्ण केले.


हेही वाचा – एकाही भ्रष्टाचार्‍याला सोडू नका सीबीआय म्हणजे न्यायाचा ब्रॅण्ड – पंतप्रधान मोदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -