घरदेश-विदेशMirzapur : शाळेतील नवीन सत्राची पुस्तके मुख्याध्यापकांनी रद्दीत विकली; शिक्षणाधिकारी करणार चौकशी

Mirzapur : शाळेतील नवीन सत्राची पुस्तके मुख्याध्यापकांनी रद्दीत विकली; शिक्षणाधिकारी करणार चौकशी

Subscribe

Mirzapur : मिर्झापूरच्या प्राथमिक शाळेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील मुख्याध्यापकांनी शाळेत ठेवलेली जुनी पुस्तके व इतर कागदपत्रांसह नवीन सत्राची सुमारे 15 ते 20 पुस्तके रद्दीवाल्याला विकली. गावातील प्रधान व इतर ग्रामस्थांना ही बाब कळताच त्यांनी रद्दीवाल्याला गाठले आणि रद्दीची पोती उघडली असता त्यांना त्यात नवीन सत्राची पुस्तके आढळून आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. (Mirzapur New session books of school sold by headmaster as junk The Education Officer will conduct an inquiry)

हेही वाचा – Ranjan Gogoi : माजी सरन्यायाधीशांनी पहिल्याच भाषणात दिल्ली सेवा विधेयककावर मांडली भूमिका

- Advertisement -

मिर्झापूरच्या छांबे विकास गटातील बजेट प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लालबहादूर यांनी शाळेतील मुलांना नवीन सत्रात वाटप करण्यात येणारी पुस्तके, आधीच्या सत्रातील जुन्या वह्या व इतर कागदपत्र रद्दीत विकल्याचे सांगितले जात आहे. ही बाब निदर्शनास येताच जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिल कुमार वर्मा यांनी गट शिक्षणाधिकारी चनबे राजेश श्रीवास्तव यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत. गट शिक्षणाधिकारी यांनी मंगळवारी (8 ऑगस्ट) शाळेत पोहोचून याप्रकरणी तपासणी केली आणि मुख्याध्यापकांना चांगलेच खडसावले आहे.

शिक्षणाधिकारी राजेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, पुस्तके रद्दीत विकल्याचे प्रकरण गावप्रमुख प्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी निर्देशनास आणून दिले आहे. सर्व पुस्तके तत्काळ शाळेत जमा आली आहेत. मुख्यध्यापकांनी चूक केली आहे, त्यांना शिक्षा होईल. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आहे, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Vaibhav Taneja : टेस्लाच्या CFO पदी भारतीय वंशाची व्यक्ती; एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय

काय आहे प्रकरण?

प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेत ठेवलेल्या जुन्या वह्या आणि इतर कागदांसह नवीन सत्राची सुमारे 15 ते 20 पुस्तके रद्दीवाल्याला विकली. प्रधान व इतर ग्रामस्थांना ही बाब कळताच त्यांनी रद्दीची पोती उघडली असता त्यांना त्यात नवीन सत्राची पुस्तके आढळून आली. लोक याप्रकरणी मुख्याध्यापकांना विचारायला गेले, परंतु त्यांनी योग्य उत्तर मिळाले नाही. मात्र, या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनी फोनवरून आदेश दिल्यानंतर मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -