घरदेश-विदेशपंतप्रधानांच्या Tweet मध्ये चूक, भाजप निशाण्यावर

पंतप्रधानांच्या Tweet मध्ये चूक, भाजप निशाण्यावर

Subscribe

PMO Indiaच्या ट्वीटमधील चुकीमुळे विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

PMO ट्वीटर हँडलवरून ट्वीट करतेवेळी झालेल्या एका छोट्याशा चुकीचा स्क्रीनशॉट, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या चुकीमुळे विरोधकांनी ट्वीटरवरुनच पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. ‘पंतप्रधान मोदी हे जातीवाद पसरवणारे मास्टर माईंड आहेत’, असे ट्वीट ‘आप’च्या हरियाणा प्रदेशाध्यक्षांनी केलं आहे. नरेंद्र मोदी मंगळवारी हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यामध्ये गेले होते. यावेळी त्यांनी एका रॅलीला संबोधित केले. या दौऱ्यादरम्यान मोदींनी दीनबंधू चौधरी (सर छोटूराम) यांच्या पुतळ्याचे अनावरणही केले. सोशल मीडियावरुन या सगळ्या कार्यक्रमाचे कॅंपेंनिंगही करण्यात आले. हरियाणा मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटरवरुन तसंच पीएमओच्या अधिकृत ट्वीटरवरुन या संपूर्ण कार्यक्रमाचे अपडेट्स दिले जात होते. याचदरम्यान PMO Indiaच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन करण्यात आलेल्या एका ट्वीटमध्ये छोटीशी चूक झाली. याच चुकीची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळते आहे.

‘ती’ चूक काय? 

PMO India ट्वीटर हँडलवरुन, ‘हे माझं सौभाग्य आहे की मला शेतकऱ्यांचा आवाज, जाट समाजाचा मसिहा, रहबर-ए-आजम, दीनबंधू छोटूराम यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली’, अशा अर्थाचं ट्वीट करण्यात आलं होतं. ज्यामध्ये दीनबंधू चौधरी यांना चुकून ‘जाटों का मसिहा’ (जाट समाजाचा मसिहा) असं संबोधलं गेलं होतं. याच शब्दावर आक्षेप घेत भाजप जातीयवाद पसरवत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. खरंतर याठिकाणी दीनबंधू यांना ‘किसानों का मसिहा’ (शेतकरी समाजाचा मसिहा) असं संबोधणं अपेक्षित होतं.

mistake in PMO tweet

मोदींवर टीकांची झोड 

—————————————————————
- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -