घरदेश-विदेश'या' कारणांमुळे १२ केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला

‘या’ कारणांमुळे १२ केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील मंत्रिमंडळाचा बुधवारी पहिल्यांदा विस्तार झाला. ४३ मंत्र्यांना मंत्रिपद देण्यात आलं. मात्र, एकीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना ज्येष्ठ मंत्र्यांच्या राजीनाम्याचं सत्र सुरुच होतं. नवे मंत्री मंत्रिपदाची शपथ घेण्याच्या काही मिनिटांपूर्वीच केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी १२ मंत्र्यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यांची राजधानी दिल्लीत जोरदार चर्चा होती. मात्र, या १२ मंत्र्यांच्या राजीनाम्या मागे कोणती कारणं आहेत अद्याप समोर आलेली नाहीत. परंतु, राजीनामे घेण्यामागे वयाचं कारण सांगितलं जात आहे. तसंच इतर काही परिस्थितींच्या आधारांवर राजीनामे घेतले जात असल्याचं देखील सांगितलं जात आहे.

- Advertisement -

माजी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली आरोग्य आणीबाणीचा फटका बसला. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. याच खात्याचे राज्यमंत्री अश्विन चौबे यांनाही त्याचाच फटका बसला. याशिवाय, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा फटका बाबूल सुप्रियो आणि देबोश्री चौधरी यांना बसल्याचं सांगितलं जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी या मंत्र्यांची गच्छंती

१) सदानंद गौडा

- Advertisement -

२) रवि शंकर प्रसाद

३) थावर चंद गेहलोत

४) रमेश पोखरियाल निशंक

५) हर्ष वर्धन

६) प्रकाश जावडेकर

७) संतोष गंगवार

८) बाबूल सुप्रियो

९) संजय धोत्रे

१०) रत्तन लाल कटारिया

११) प्रताप चंद्र सारंगी

१२) सुश्री देबश्री चौधरी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -