घरदेश-विदेश'आज जम्मू काश्मीर घेतलं उद्या पाकव्याप्त काश्मीर घेऊ'

‘आज जम्मू काश्मीर घेतलं उद्या पाकव्याप्त काश्मीर घेऊ’

Subscribe

आज जम्मू - काश्मीर घेतले, उद्या बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरही घेऊ, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

आज जम्मू काश्मीर घेतले, उद्या बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरही घेऊ, असा विश्वास व्यक्त करत देशाच्या पंतप्रधानपदी असणारे नरेंद्र मोदी हे अखंड भारताचे स्वप्न नक्कीच पूर्ण करतील‘, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत बोलतेवेळी सदनासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दाद दिली आहे. सोमवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात येण्याविषयीचा प्रस्ताव मांडला. शिवाय काश्मीरमधील अनुच्छेद ३५ A रद्दही करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाची घेषणा केल्यानंतर सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात केली असून या निर्णयाचे शिवसेनेकडूनही स्वागत करण्यात आले आहे.

आणखी एक क्रांतीचा दिवस

देशाच्या इतिहासात १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन, ८ ऑगस्ट हा क्रांतीदिन आणि ५ ऑगस्ट या दिवशी आणखी एक क्रांतीचा दिवस लिहिला गेला असल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. हा अतिशय कठीण आणि महत्त्वपूर्ण, असा निर्णय घेतला खरा. पण त्याला विरोध हा होणारच. तसेच विरोध तर या ठिकाणी झोपा काढतोय या शब्दांत त्यांनी विरोधी पक्षांना टोला लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कलम ३७० म्हणजे काय? ३७० रद्द केल्याने काय होणार?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -