घरदेश-विदेशMP: आम्ही निवडून आलो तर IPL टीम बनवणार; 100 युनिटपर्यंत वीजही मोफत,...

MP: आम्ही निवडून आलो तर IPL टीम बनवणार; 100 युनिटपर्यंत वीजही मोफत, काँग्रेसचा जाहिरनामा

Subscribe

काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये IPL टीम तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच महिला, युवक आणि शेतकरी वर्गावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याशिवाय राज्यात 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

नवी दिल्ली: MP Assembly Election 2023: या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात पक्ष उतरले आहेत. काँग्रेस पक्षाने मध्य प्रदेशसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यातच काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये IPL टीम तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच महिला, युवक आणि शेतकरी वर्गावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याशिवाय राज्यात 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. (MP We will make IPL team if elected Electricity up to 100 units also free Congress manifesto)

शेण खरेदी केलं जाईल

शेतकरी वर्गाला आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने तांदूळ 2500 रुपये प्रति क्विंटल आणि गहू 2600 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शेणखत 2 रुपये किलो दराने खरेदी करण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे.

- Advertisement -

महिलांना एवढे पैसे मिळतील

सरकारने एलपीजी सिलिंडर 500 रुपयांना देण्याची घोषणा केली आहे. महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचे आश्वासनही दिले आहे. काँग्रेसने एक कोटीहून अधिक वीज ग्राहकांना 100 युनिट मोफत वीज देण्याचे सांगितले आहे. तर 200 युनिट वीज निम्म्या दराने दिली जाईल.

‘ही’ आहेत काँग्रेसची मोठी आश्वासनं

  •  महिलांना नारी सन्मान निधी म्हणून दरमहा 1500 रुपये दिले जातील.
  • जय किसान कृषी कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी.
  •  घरगुती गॅस सिलिंडर 500 रुपयांना मिळेल.
  •  इंदिरा गृह ज्योती योजनेंतर्गत 100 युनिट वीज सवलत दिली जाईल आणि 200 युनिट अर्ध्या दराने दिली जाईल.
  •  जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरू केली जाईल.
  • बहु-दिव्यांगांच्या पेन्शनची रक्कम वाढवून 2000 रुपये केली जाईल.
  •  जात जनगणना करणार.
  • सरकारी सेवा आणि योजनांमध्ये ओबीसींना 27 टक्के कोटा मिळेल.

हा खोटा जाहीरनामा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा खरपूस समाचार घेतला आहे. शिवराज म्हणाले, हा काँग्रेसचा जाहीरनामा नाही, खोटेपणाचे पत्र आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी 900 हून अधिक आश्वासने दिली होती, परंतु त्यापैकी नऊ आश्वासनं सुद्धा पूर्ण केली नाहीत. त्यांनी आता पुन्हा खोटेपणाचा बाजार मांडला आहे. या खोट्या गोष्टींवर जनता विश्वास ठेवणार नाही. भाजप जे म्हणेल ते करतेच हे लोकांना माहीत आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Photo : वर्ल्डकप विजेता माजी कर्णधार ‘बुमराह’बद्दल काय म्हणाला? )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -