घरदेश-विदेशEaster Day : यामुळे देशभरात साजरा केला जातो हा सण

Easter Day : यामुळे देशभरात साजरा केला जातो हा सण

Subscribe

देशभरात आज 'ईस्टर संडे' साजरा केला जात आहे. या ईस्टर संडेच्या निमित्ताने देशभरात उत्साही आणि आनंदी वातावरण पाहयला मिळत आहे.

देशभरात आज, ईस्टर संडे साजरा केला जात आहे. या ईस्टर संडेच्या निमित्ताने देशभरात उत्साही आणि आनंदी वातावरण पाहयला मिळत आहे. ख्रिस्ती धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या ईस्टर संडेच्या निमित्ताने शनिवारी मध्यरात्रीपासून शुभेच्छांना उधाण आल्याचे पाहायला मिळत होते. प्रत्येक चर्चमध्ये ईस्टरचा उत्साह पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

ईस्टर संडेचा उत्साह

मुंबई, गोवा, केरळ, तमिळनाडू अशा विविध ठिकाणी असणाऱ्या चर्चमध्ये ख्रिस्त धर्मियांनी प्रार्थनेसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ईस्टरच्या निमित्ताने अनेकांनी चर्चमध्ये जात मेणबत्ती पेटवून येशू ख्रिस्तांकडे प्रार्थना केली असून, त्यांच्या अस्तित्वाविषयी आभार व्यक्त केले आहेत. आजच्या दिवशी विविध ठिकाणी ईस्टरच्या निमित्ताने https://twitter.com/ANI/status/1119661400526340097काही स्नेहभोजनाच्या कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात येते. तसेच संपूर्ण कुटुंब, समुदाय आणि मित्रपरिवार यांच्या एकत्र येण्याचा असा हा ईस्टर संडे असतो.

- Advertisement -

का साजरा केला जातो ईस्टर संडे?

क्रुसावर ईसा मसीह अर्थात येशू ख्रिस्त यांनी देह त्याग केल्यानंतर त्यांचे पुनरुत्थान झाले होते. त्यानंतर ते जवळपास ४० दिवसांसाठी त्यांच्या अनुयायांसोबत आणि भक्तांसोबत वास्तव्यास होते. म्हणूनच हा दिवस म्हणजेच ईस्टर संडे साजरा करण्यात येतो. तसेच नाताळप्रमाणेच या दिवशी सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -