घरदेश-विदेशदिल्लीत परदेशी महिलेसह तिच्या मुलाची हत्या, दोन संशयित ताब्यात

दिल्लीत परदेशी महिलेसह तिच्या मुलाची हत्या, दोन संशयित ताब्यात

Subscribe

मृत महिलेच्या मैत्रीणीसह तिच्या मित्रावर पोलिसांचा संशय

दिल्लीतील कालकाजी भागात एका परदेशी महिलेसह तिच्या मुलाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय.

मृत महिलेचं नाव मिसकल जहूम्बेव, तर मुलाचं नाव मानस आहे. मंगळवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास संबंधित महिलेच्या मित्रांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना बेडरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेसह तिच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. या दोघांचीही चाकूने हत्या झाल्याचं पुढे आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या घरात ही घटना घडली, ते घर मिसकलच्या मैत्रिणीच्या मित्राचं आहे. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

मिसकल ही पती विनय याच्यासोबत राहत होती. सोमवारी रात्री मिसकल आणि विनय यांच्यात भांडण झालं होतं. भांडणानंतर विनय मित्राकडे निघून गेला. त्यानंतर मिसकलने उज्वेकिस्तानच्या मतलुबा नावाच्या मैत्रीणीला घरी बोलवलं. मतलुबाने आपल्या अविनिष या मित्राला घेऊन आली आणि मिसकलसह मानसला सोबत घेऊन गेले. मात्र, मंगळवारी सकाळी मिसकल आणि मानसचा मृतदेह आढळले. दोघांच्याही शरीरावर चाकूचे घाव आहेत.

दोघा संशयितांना घेतलं ताब्यात

दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय. प्राथमिक माहितीनुसार मतलुबा आणि अविनिषचा या हत्येत सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावलीय. मात्र, तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलंय. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात अन्य कुणी तिसऱ्या व्यक्तीचा वावर असण्याचे पुरावे नाहीत. दरम्यान, मिसकलनेच मुलाची हत्या करुन स्वतःवर चाकूने वार करत आत्महत्या तर केली नसावी, यादृष्टीनेही पोलीस तपास सुरू आहे. तसं झालं असेल तर ही घटना घडताना घरात असलेल्या दोघा संशयितांना कोणताही आवाज कसा गेला नाही, याचाही तपास सुरू आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -