घरदेश-विदेशअमित शाह म्हणाले हिंदीत बोला; संगीतकार ए आर रहमानचा विरोध, म्हणाला...

अमित शाह म्हणाले हिंदीत बोला; संगीतकार ए आर रहमानचा विरोध, म्हणाला…

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदीवरील वक्तव्यावरुन शनिवारी भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष AIADMK यासह दक्षिण भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची विरोधाची भूमिका कायम राहिली. दरम्यान, संगीतकार एआर रहमान यांनीही या वादात उडी घेतली आहे. ऑस्कर पुरस्कार विजेते एआर रहमान यांनी तमिळ भाषेत पोस्ट केलेल्या एका छायाचित्रामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. हिंदी हा इंग्रजीला पर्याय असू शकतो, असे शाह म्हणाले होते.

दरम्यान, रहमानने एक फोटो पोस्ट केले आणि तमिळ भाषेला समर्पित गाण्याचे संकेत देत ‘तमिझानंगु’ लिहिले. फोटोवरती एक ओळ आहे, जी तमिळ कवी भारतीदासन यांच्या कवितेतील आहे. मध्ये सांगितलं आहे की, तामिळ हे आपल्या अस्तित्वाचे मूळ आहे. रहमानने पोस्ट केलेल्या छायाचित्रात लाल पार्श्वभूमीत पांढरी साडी घातलेली एक महिला दिसते जी तमिळ भाषिक लोकांच्या भावना आणि हिंदी लादण्याला त्यांचा विरोध दर्शवते.

- Advertisement -

सोशल मीडियावर या फोटोची जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर एका गटाने रहमानचे कौतुक केलं आहे. लाल पार्श्वभूमीत छायाचित्र पोस्ट करून हिंदी आणि तमिळ भाषेला पूर्ण पाठिंबा दिला आहे, असं या गटाचं म्हणणं आहे. तर इतरांनी छायाचित्र पोस्ट करण्याच्या त्याच्या हेतूवर शंका घेतली. ट्विटरवर एका युजरने म्हटलं की, संगीत दिग्दर्शकाने हिंदी चित्रपटांमध्ये काम करून पैसा कमावला आणि लोकप्रियता मिळवली आणि आता हिंदीला टार्गेट करत आहे.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सांगितलं की, स्थानिक भाषांऐवजी हिंदीला इंग्रजीचा पर्याय म्हणून स्वीकार केला पाहिजे. राजभाषेवरील संसदीय समितीच्या ३७ व्या बैठकीचे अध्यक्षस्थान करताना शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतला आहे की सरकार चालवण्याचे माध्यम राजभाषा आहे आणि त्यामुळे हिंदीचे महत्त्व नक्कीच वाढेल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -