घर देश-विदेश त्यांचे केस दिसत होते...; मुस्लिमबहुल देशात 14 मुलींसोबत लज्जास्पद कृत्य

त्यांचे केस दिसत होते…; मुस्लिमबहुल देशात 14 मुलींसोबत लज्जास्पद कृत्य

Subscribe

इंडोनेशियामध्ये 14 विद्यार्थिनींना फक्त हिजाब नीट न घातल्यामुळे मुंडन केलं आहे. यावरून आता गदारोळ सुरू आहे. शाळेतील एका शिक्षकाच्या सांगण्यावरून हे काम करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार, या मुलींनी हिजाब नीट परिधान केला नव्हता.

नवी दिल्ली: मुस्लिमबहुल देशांमध्ये हिजाब परिधान करण्यावरून अनेकदा वाद होत असल्याचं आपण पाहिलंच आहे. इराणमध्ये तर हिजाब परिधान करण्यावरून रान उठलं होतं. एका मुलीनं हिजाब परिधान केलं नाही म्हणून तिला जीवानिशी मारण्यात आलं. शेकडो महिलांनी रस्त्यावर उतरत आंदोलनं केली होती. आता असाच एक घृणास्पद प्रकार इंडोनेशिया या मुस्लिमबहुल देशात घडला आहे. या देशातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे एका शाळेने 14 विद्यार्थिनींना फक्त हिजाब नीट न घातल्यामुळे मुंडन केलं आहे. यावरून आता गदारोळ सुरू आहे. शाळेतील एका शिक्षकाच्या सांगण्यावरून हे काम करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार, या मुलींनी हिजाब नीट परिधान केला नव्हता. (Muslim World 14 girls head shaves in Indonesia due to not wearing hijab Properly)

इंडोनेशिया हा खूप उदारमतवादी देश असला तरी येथे महिलांसाठी काही कठोर नियम असल्याचे सांगितले जाते. इंडोनेशियामध्ये 14 मुलींचं मुंडन केल्याची घटना अशा वेळी समोर आली आहे जेव्हा 2021 मध्ये येथील शाळांमध्ये सक्तीच्या ड्रेस कोडवर बंदी घालण्यात आली आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की इंडोनेशियामध्ये अनेक मुस्लिम शाळा आहेत, ज्या मुलींना हिजाब घालण्याच्या सक्त सूचना देतात.

23 ऑगस्ट रोजी हे प्रकरण समोर आलं

- Advertisement -

हे प्रकरण इंडोनेशियातील माश्रिकी जावा येथील सरकारी कनिष्ठ हायस्कूलशी संबंधित आहे. येथे 23 ऑगस्ट रोजी एका शिक्षकाने 14 मुलींचं मुंडन करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील शिक्षिकेचं निलंबन करण्यात आले आहे. तसंच, शाळेने मुलींच्या पालकांची माफी मागितली आहे.

कठोर कारवाईची मागणी केली

मुलींना हिजाब घालण्याची गरज नसून त्यांना डोकं झाकून आणि स्कार्फ परिधान करून शाळेत येण्यास सांगितले जात असल्याची माहिती शाळेने दिली आहे. असं असूनही, मुलींनी असे कपडे घातले होते, ज्यामुळे त्यांचा चेहरा आणि डोकं दिसत होतं. मुंडन करण्यात आलेल्या मुलींना मानसिक आधार दिला जाईल, असे शाळेकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी मानवाधिकार कार्यकर्त्यांनी शिक्षिकेच्या कारवाईला विरोध करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: ईडीच्या अधिकाऱ्यावरच लावला कंपनी मालकाने आरोप; बाहेरुन फाइल आणून Computer मध्ये टाकली…

- Advertisment -