Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश ईडीच्या अधिकाऱ्यावरच लावला कंपनी मालकाने आरोप; बाहेरुन फाइल आणून Computer मध्ये टाकली...

ईडीच्या अधिकाऱ्यावरच लावला कंपनी मालकाने आरोप; बाहेरुन फाइल आणून Computer मध्ये टाकली…

Subscribe

पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखील सुजय कृष्ण भद्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोलकता : पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये नोकरी लावून देण्याच्या बदल्यात कोट्यवधी रुपये घेण्याच्या आरोपाखाली ईडी अधिकाऱ्यांनी एका व्यावसायिक कंपनीवर छापा टाकला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 18 तास कंपनीची झाडाझडती घेतली. मात्र, या कारवाईनंतर त्या कंपनी मालकाने चक्क ईडीच्या अधिकाऱ्यावरच आरोप लावल्याने त्या अधिकाऱ्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. यातून आता काय समोर येते हे येणारा काळच सांगणार आहे. (The company owner accused the ED officer; Brought the file from outside and put it in the computer…)

पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखील सुजय कृष्ण भद्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यावर छापा घातला. मात्र दक्षिण कोलकाता येथील कंपनीच्या कर्मचाऱ्याने ईडी अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केल्यानंतर कोलकाता पोलिसांनी ईडीला समन्स पाठवले. याच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अप्रत्यक्षपणे केंद्रीय एजन्सीच्या अधिकाऱ्यांवर पुरावे तयार केल्याचा आरोप केला होता हे विशेष.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला हल्ला

- Advertisement -

सोमवारी एका मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मला काल कोणाकडून एक संदेश आला होता की, अभिषेकला त्याच्या संगणकावरून सर्व पुरावे मिळाले असल्याने त्याला लवकरच अटक केली जाईल. होय, त्यांनी संगणक जप्त केला असून, त्यांनी पुन्हा एकदा पुराव्याच्या फाईली हस्तगत केल्याचे सांगितले. मात्र, त्यांना हे माहिती नाही की, ज्या फाईल्स कॉम्प्युटरमध्ये नव्हत्या त्या टाकण्याचे सर्व पुरावेही आम्ही काढले आहेत. या प्रकरणी सामान्य डायरीही दाखल केली असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

हेही वाचा : मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली, कारण…, ममता बॅनर्जींचे शरसंधान

बचावासाठी ईडीने दिले स्पष्टीकरण

- Advertisement -

याप्रकरणी ईडीने स्पष्टीकरण दिले की, आम्ही आधीच कोलकता पोलिसांना फाईली संदर्भात माहिती दिली आहे. तर पुढे त्यांनी सांगितले की, त्यांच्या एका अधिकाऱ्याने आपल्या मुलीसाठी वसतीगृह शोधत असताना नकळत फाइल डाउनलोड केली होती. ईडी अधिकाऱ्याच्या मुलीने अलीकडेच पश्चिम बंगालमधील एका प्रतिष्ठित अभियांत्रिकी विद्यापीठात प्रवेश घेतला आहे.

हेही वाचा : हीच वारसदार; सुनेच्या निधनानंतर नुकसानभरपाईचे 1.31 कोटी सासूला देण्याचे न्यायालयाचे आदेश

राजकीय वातावरण तापले

ईडीने केलेल्या कारवाईनंतर आणि त्यानंतर ईडी अधिकाऱ्यावर झालेल्या आरोपानंतर पश्चिम बंगामध्ये सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनावरही झाले आहेत. दरम्यान या कारवाईमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

- Advertisment -