घरदेश-विदेशFarooq Abdullah : काश्मीर हा भारताचाच, अब्दुल्ला थेटच म्हणाले

Farooq Abdullah : काश्मीर हा भारताचाच, अब्दुल्ला थेटच म्हणाले

Subscribe

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येतायत तसतशी इंडिया आघाडीमधील वाद कमी होताना दिसतायत. सपा आणि आम आदमी पक्षासोबत जागावाटपाच्या चर्चा यशस्वी झाल्या आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमधील लोकसभेच्या पाचही जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला होता. आता जम्मू-काश्मीरमध्येही इंडिया आघाडी होते का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यातच, फारूख अब्दुल्ला यांचे एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. काश्मीर हा भारताचाच भाग होता आणि पुढेही कायम राहील, असे विधान फारूख अब्दुल्ला यांनी केले आहे.

हेही वाचा – Thackeray group : बावनकुळे हे भाजपाचे थिल्लर नेते, ठाकरे गटाचा घणाघात

- Advertisement -

एका कार्यक्रमात फारूख अब्दुल्ला म्हणाले की, काश्मीर हा भारताचा भाग होता. आजही काश्मीर भारताचा भाग आहे आणि नेहमीच भारताचा भाग राहील. आपल्या देशात असलेल्या विविधतेचे संरक्षण करणे आवश्यक आहे. “धर्म आपल्यात फूट पाडत नाही, धर्म आपल्याला एकत्र करतो. असा कोणताही धर्म नाही जो वाईट असतो, तो आपणच आचरणात आणतो. जर आपल्याला पुढे जायचे असेल, तर एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे, आव्हानांना सामोरे जाणे हाच एकमेव मार्ग आहे. अशाच शक्तींविरोधात आम्ही एकत्रितपणे सामोरे जात आहोत, असेही अब्दुल्ला म्हणाले. दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांनी ईव्हीएम मशीनवर प्रश्न उपस्थित केला. निवडणूक आयोग निष्पक्षपातीपणे निवडणुका घेईल, अशी आशा आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्राला बळकट करण्यासाठी त्यातील विविधता जपली पाहिजे, असे मत फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – Vijay Wadettiwar : मनोज जरांगेंना कोणाचे ओएसडी आणि पीए भेटत होते? वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

- Advertisement -

भाजपसोबत युती करण्याची अब्दुल्ला यांची इच्छा

भाजपासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न फारूक अब्दुल्ला सातत्याने करत होते. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतरही फारूक अब्दुल्ला यांची हीच इच्छा होती. त्या प्रक्रियेचा मीदेखील एक भाग होतो. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पुन्हा एकदा फारूक अब्दुल्ला यांनी तसा प्रयत्न केला होता, असा दावा भाजपा नेते देवेंद्र सिंह राणा यांनी केला होता. दरम्यान, असे असले तरी सध्या फारुख अब्दुल्ला इंडिया आघाडीचा भाग आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -