घरदेश-विदेशछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भूसुरुंग हल्ला; तीन जणांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भूसुरुंग हल्ला; तीन जणांचा मृत्यू

Subscribe

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी भूसुरुंग हल्ला करुन एक डिझेल टँकर उडवला. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला.

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मंगळवारी भूसुरुंग लावून एक डिझेल टँकर उडवला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तीन जणांची अद्यापही ओळख पटलेली नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या घटनेचा पुढील तपास लावत आहेत. कांकेर जिल्ह्याच्या कोसरोंडा आणि तुमापाल या गावादरम्यान ही दुर्घटना घडली. या परिसरात सध्या रेल्वे रुळाचे काम सुरु आहे. त्यामुळे त्या भागात टँकरने डिझेल नेले जात होते. यावेळी नक्षलवाद्यांनी भूसुरुंग लावून टँकर उडवला.

हेही वाचा – छत्तीसगडमध्ये चकमक; पाच नक्षलवादी ठार 

- Advertisement -

पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ला चिंतेचा विषय बनला आहे. मंगळवारी पुन्हा नक्षलवाद्यांनी भूसुरुंग घडवून डिझेलचा टँकर उडवला. या हल्ल्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर नक्षलवादी परिसरात लपून बसले होते. दुर्घटना झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोध मोहिम सुरु केली. या शोध मोहिमेदरम्यान नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात चकमक झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -