घरदेश-विदेशउत्तर भारतात जाणवले भूकंपाचे धक्के; पाकिस्तानात १९ जणांचा मृत्यू

उत्तर भारतात जाणवले भूकंपाचे धक्के; पाकिस्तानात १९ जणांचा मृत्यू

Subscribe

पाकिस्तानमध्ये झालेल्या भूकंपात १९ जणांचा मृत्यू तर ३०० हून अधिक जण जखमी

- Advertisement -

दिल्ली-एनसीआरमध्ये आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के बसले असून यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असंख्य लोकांना भीतीपोटी घराबाहेर तसेच कार्यालयाबाहेर पडावे लागले. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसले आहेत. पाकिस्तानला भूकंपाचे सर्वाधिक फटके बसले असून त्यात ५ जण ठार झाले असून ५० जण जखमी झाले आहेत. भूकंपामुळे पाकिस्तानच्या रस्त्यांवर भेगा पडल्या असून भूकंपामुळे अनेक वाहने उलटल्याची माहिती आहे.

- Advertisement -

नवी दिल्ली, चंदीगड, काश्मीर तसेच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह खैबर पख्तून प्रांतासह काही शहरांमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले. युरोपीअन मेडिटेरनीन सिस्मोलॉजिकल सेंटरने याची माहिती दिली आहे. पाकिस्तानच्या लाहोर प्रांतापासून उत्तर पश्चिम भागात १७३ किमी अंतरावर पीओकेत या भूकंपाचे केंद्र असल्याचे या एजन्सीने म्हटले आहे. जम्मू काश्मीरलगत भारत-पाकिस्तान सीमेजवळ भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. काश्मीरमधील राजौरी, पुंछ, जम्मू, उधमपूर आणि कठुआ जिल्ह्यात हे धक्के जाणवले आहेत. तसेच दिल्लीसह अन्य राज्यातही भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. मीरपूर जवळील पीओकेच्या जाटलान परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती आहे. पीओकेत भूकंपामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या भूकंपात ५ जणांचा मृत्यू आणि ५० लोक जखमी झाले आहेत. रस्त्यांना तडे गेले असून रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या उलटल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -