घरदेश-विदेशबोगस काम बंद करो, इसका अंजाम मिलेगा! गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे धमकीचे बॅनर

बोगस काम बंद करो, इसका अंजाम मिलेगा! गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे धमकीचे बॅनर

Subscribe

रस्ते कामांवरून नक्षलवाद्यांनी झळकवले धमकीचे बॅनर

गडचिरोलीत नक्षवाद्यांच्या कारवाया सुरुच आहेत. गडचिरोलीतील शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील रस्ते कामांना नक्षवाद्यांनी विरोध करत धमकी देणारे बॅनर झळकावले आहे. या बॅनरमध्ये काम थांबवा नाही तर, याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असे इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या गावात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गडचिरोली सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ येथील १३ कि अंतरावरील पेंटीपाका चेक गावापासून ८०० मीटर अंतरावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु आहे.

या रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला नसून काम बंद करा असा इशारा नक्षलवाद्यांनी बॅनरमधून दिली आहे. सिंरोचा तालुका मुख्यालयाजवळच हे नक्षली बॅनर आढळल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या नक्षली बॅनरवर ‘बोगस काम बंद करो, इसका अंजाम मिलेगा’ असे लिहित भाकप माओवादी असाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या गावात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याआधीही अनेकदा नक्षलावाद्यांकडून धमकी देणारे बॅनर झळकावत कारवाया करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत शेकडो निरपराध आदिवासी नारिकांची हत्या या नक्षली कारवायांमध्ये झाली आहे. यापूर्वी जवानांच्या सी-६० पथकाने छत्तीसगड सीमेवरील माओवाद्यांच्या गड असलेल्या अबुझमाड मध्ये धडक देत जवानांनी त्यांच्या शिबिर उधळून लावले. यावेळी शस्त्र बनविण्याचा कारखाना उध्वस्त केला तब्बल ४८ तास घनदाट जंगलात माओवाद्यांविरुद्ध यशस्वीपणे अभियान राबवुन परत आलेल्या सी-६० जवानांची ही सर्वात मोठी कारवाई होती. माओवाद्यांच्या गड असलेल्या अबुझमाडमध्ये शिरून विशेष अभियान राबवित असताना जवानांना बॅरेल ग्रेनेड लॉन्चर या शस्त्राची निर्मिती होत असल्याचे आढळले.यासोबतच कुकर बॉम्ब,भुसुरुंग स्फोटके आणि इतर दररोज वापरावयाचे साहित्य आढळले.

- Advertisement -

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -