घरदेश-विदेशजम्मू काश्मीरमध्ये चकमक; एका अतिरेकाला कंठस्नान

जम्मू काश्मीरमध्ये चकमक; एका अतिरेकाला कंठस्नान

Subscribe

जम्मू - काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील पिंजुरा गावात आणि जैनपोरा सेक्टरमध्ये तर कुलग्राम जिल्ह्यातील मोहम्मद पोरा परिसरात सीमा भागामध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे.

जम्मू–काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरुच असतानाच पुन्हा एकदा सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. जम्मू काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील पिंजुरा गावात आणि जैनपोरा सेक्टरमध्ये तर कुलग्राम जिल्ह्यातील मोहम्मद पोरा परिसरात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. राज्यात एकाच वेळी तीन ठिकणी सर्च ऑपरेशन सुरु आहे. या तिनही ठिकाणी दहशतवादी हालचाली सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई सुरु करण्यात आली आहे. या चकमकीत एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. संबंधित परिसरातील प्रत्येक घराची तपासणी केली जात असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

सुरक्षा दलांना शोपियां आणि कुरग्राम जिल्ह्यातील काही ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार, पिंजुरा गावात आणि जैनपोरा सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन सुरु केले. दरम्यान, कुरग्राम जिल्ह्यातील मोहम्मद पोरा येथे सर्च ऑपरेशन सुरु असताना दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात तीन दहशतवादी लपले असून यातील एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -