घरदेश-विदेशमोदी सरकार लोकांचे खिसे कापत असून पाकिटमार सरकार बनलंय; इंधन दरवाढीवरुन नवाब...

मोदी सरकार लोकांचे खिसे कापत असून पाकिटमार सरकार बनलंय; इंधन दरवाढीवरुन नवाब मलिकांची टीका

Subscribe

पेट्रोल डिझेलचे दर वाढवून मोदी सरकार लोकांचे खिसे कापत असून हे पाकिटमार सरकार बनलंय अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढतच आहेत. काही जिल्ह्यात पेट्रोलचा दर शंभरावर पोहोचला आहे. जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत हे मोदींनी जनतेला सांगितलं पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

आता कोरोनाचे संकट असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे याचे पडसाद महागाई वाढण्यावर होत आहेत त्यामुळे लोकांची लूट थांबवावी आणि जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत तेच भारतात असावेत असे सांगतानाच तेलाची लूट थांबवावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

- Advertisement -

देशातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर

मुंबई
पेट्रोल- ९७.८६ रुपये/लिटर
डिझेल- ८९.१७ रुपये/लिटर

दिल्ली
पेट्रोल- ९१.५३ रुपये/लिटर
डिझेल- ८२.०६ रुपये/लिटर

- Advertisement -

कोलकाता
पेट्रोल- ९१.६६ रुपये/लिटर
डिझेल- ८४.९० रुपये/लिटर

चेन्नई
पेट्रोल- ९३.३८ रुपये/लिटर
डिझेल- ८६.९६ रुपये/लिटर

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -