घरदेश-विदेशशंभर विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

शंभर विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

Subscribe

बिहारच्या लखिसराई जिल्ह्यातील शासकीय शाळेत वाढल्या गेलेल्या अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तब्बल शंभर मुलांची प्रकृती बिघडली असून स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जवाहर नवोदय विद्यालयात ही घटना घडली. गुरुवारी शाळेत मिळालेले अन्न खाल्यानंतर मुलांना अस्वस्थ वाटायला लागले होते. त्यांच्या पोटात दुखण्यास आणि उलट्या सुरु झाल्या. यानंतर मुलांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचास सुरु केले आहे. अन्नातून विषबाधा झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्रकृती बिघडणाऱ्या दहा विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असून वाटलेल्या अन्नाचे नमुने जमा करण्यात आले असल्याचे एस. के. चौधरी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले.

या पूर्वीही उत्तराखंड येथील उधम सिंह नगरमध्ये आंगणवाडी केंद्रामधून वितरित केलेल्या फुट पॅकेट्सवर गाई-डुकाराचे मांस असल्याची घटना घडली होती. मुलांना वितरीत केलेल्या फुट पॅकेट्सवर ही सूचना लिहीण्यात आली होती. मुलांना फुड पॅकेट्स वाटण्यात आल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी या विरोधात स्थानीक पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. वाटण्यात आलेल्या अन्नात गाय आणि डुकराचे मांस असल्याचा आरोप पालकांनी केला होता. जिल्हा कार्यालयाकडून या प्रकरणी तपासाचे आदेश देण्यात आले होते. हे फुड पॅकेट्स मागील आठवड्यात या केंद्रावर वाटण्यात आली असल्याचे आंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असल्यास अन्नात ओट्स आणि सोयाबिन असल्याचे सांगण्यात होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -