घरदेश-विदेशनेस्ले मॅगीच्या १० रिकाम्या पॅकेटवर एक मॅगी फ्री

नेस्ले मॅगीच्या १० रिकाम्या पॅकेटवर एक मॅगी फ्री

Subscribe

नेस्लेने सुरु केलेल्या स्कीमचा ग्राहकांना फायदा होणार त्याचसोबत प्रदूषणाला आळा बसणार आहे. यामुळे ग्राहकांचे वागणे बदलेल. ते कचरा इथे तिथे फेकणार नाहीत.

देशभरामध्ये प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि त्यामुळे पर्यावरणावर होणारा परिणामावर चिंता व्यक्त केली जात आहे. अशामध्येच देशातील सर्वात मोठी फूड कंपनी असलेल्या नेस्ले इंडियाने प्लास्टिकच्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नेस्ले कंपनीने ‘प्लास्टिक बंदी’ ची घोषणा गांभीर्याने घेतली आहे. कंपनीने मॅगी नूडल्ससाठी एक नवीन स्कीम सुरु आहेत. मॅगी नुडल्सच्या प्रत्येक १० रॅपरच्या बदल्यात तुम्हाला एक मॅगी पॅकेट मिळणार आहे. ही स्कीम आता देहराडून आणि मसूरीमध्ये सुरु करण्यात आली आहे. लवकरच ही स्कीम इतर राज्यामध्ये सुरु केली जाणार आहे.

नेस्लेची नवी स्कीम

नेस्ले कंपनीच्या या स्कीममुळे मॅगीच्या रॅपरवरील प्लास्टिकचा पुनरवापर करण्यात येणार आहे. यासाठी कंपनीतर्फे ‘MAGGI Wrappers return’ ही स्कीम राबवली जाणार आहे. या माध्यमातून ग्राहकांना फ्री मॅगी पॅकेट मिळणार आहे. या ऑफरनुसार, मॅगी नुडल्सच्या प्रत्येक दहा रॅपरच्या बदल्यात तुम्हाला एक मॅगी पॅकेट मिळणार आहे. ‘सध्या नेस्ले इंडियातर्फे २५० विक्रेत्यांसोबत हा कार्यक्रम राबविला जातोय. यामुळे ग्राहकांच्या प्लास्टिक टाकून देण्याच्या वर्तनात बदल होईल असं नेस्लेचं म्हणणं आहे. नेस्लेच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, सध्या ग्राहक मॅगीचे खाली पॅकेट डस्टबिनमध्ये न टाकता इकडे तिकडे फेकले जाते. या स्कीममुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, ग्राहकांचा व्यवहार बदलून जाईल. त्यामुळे त्यांना डस्टबिनमध्ये टाकण्याची आठवण होईल.

- Advertisement -

ग्राहकांची सवयी बदलेल

गती फाऊंडेशन आणि उत्तराखंड एनवारमेंट प्रोटेक्शन अॅण्ड पोल्युशन कंट्रोल बोर्डाने केलेल्या अभ्यासातून हे समोर आले होते की, उत्तराखंडमध्ये गोळा करण्यात आलेल्या प्लास्टिक कचऱ्यामध्ये मॅगी, पेप्सिको, लेज चिप्स आणि पारले कंपनीच्या फ्रुटीचा समावेश होता. या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन करणे कठीण होतं. नेस्लेचे प्रवक्त्यांनी असे सांगितले आहे की, नेस्लेने सुरु केलेल्या स्कीमचा ग्राहकांना फायदा होणार त्याचसोबत प्रदूषणाला आळा बसणार आहे. यामुळे ग्राहकांचे वागणे बदलेल. ते कचरा इथे तिथे फेकणार नाहीत.

याठिकाणी आहे प्लास्टिक बंदी

नेस्ले इंडिया कंपनीच्या या स्कीममध्ये रिकामे पॅकेट एकत्र करुन त्याचे निराकरण करण्याचे काम इंडियन पोलूशन कंट्रोल असोसिएशन करणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड आणि तमिलनाडूमध्ये आधीच प्लास्टिकवर बंद घालण्यात आली आहे. त्यामुळे कंपन्यांनी प्लास्टिकचा वापर कमी करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -