घरदेश-विदेशFarmer Protest : पंतप्रधान शेतकरी आंदोलनावर बोलले, अन् लोकसभेत विरोधकांनी केला सभात्याग

Farmer Protest : पंतप्रधान शेतकरी आंदोलनावर बोलले, अन् लोकसभेत विरोधकांनी केला सभात्याग

Subscribe

नव्या कृषी कायद्याविरोधात लोकसभेतला गोंधळ नियोजनबद्ध - नरेंद्र मोदी

नव्या कृषी कायद्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत बोलत असताना विरोधकांनी लोकसभेच्या कामकाजातून सभात्याग केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असताना विरोधकांनी सभागृह सोडले. लोकसभेत पंतप्रधान नव्या कृषी कायद्याच्या निमित्ताने शेतकरी आंदोलनावर बोलू लागल्यानंतर विरोधकांनी आपला गोंधळ आणखी वाढवायला सुरूवात केली. त्यावर लोकसभा अध्यक्षांनीही अनेकदा मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले. पण गोंधळ सुरूच राहिला. त्यावर पंतप्रधानांनीही आपल्या शैलीत जोरदार हल्ला चढवत स्पष्ट केले की, शेतकरी हे चुकीच्या माहितीचे आणि अफवांचे बळी ठरलेले आहे. वारंवार शेतकऱ्यांना खोट सांगितले जात आहे. शेतकऱ्यांमध्ये विरोधकांनी पसरवलेल्या अफवांचा भांडाफोड होऊ नये म्हणूनच माझ्या भाषणादरम्यान असा गोंधळ घातला जात असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला. हे नियोजित षडयंत्र असल्याचे विधान मोदी यांनी केल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला.

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा सरकारला आदर आहे. शेतकऱ्यांचा सरकारने आतापर्यंत आदरच केला आहे. पंजाबपासूनच शेतकऱ्यांसोबत चर्चेचा पवित्रा सरकारने घेतलेला आहे. अगदी दिल्लीत आल्यानंतरही शेतकऱ्यांनी चर्चेचा पर्याय खुला ठेवला आहे. पण दिल्लीचे शेतकरी हे चुकीच्या माहितीचे आणि अफवांचे बळी ठरलेले आहेत. देशात नवीन तीन कृषी कायदे आणताना अध्यादेश काढण्यात आला. त्यानंतर हे कायदे संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झाल्यानंतरच आणि कायद्यांना मंजुरी मिळाल्यानंतरच या कायद्यांची अंमलबजावणी झाली. देशात तिन्ही कायदे अंमलात आल्यापासून देशात एकही मंडई बंद झालेली नाही. तसेच एकही कृषी उत्पन्न बाजार समिती बंद झालेली नाही. हेच सत्य शेतकऱ्यांकडून लपविण्यात येत आहे. उलट देशात गेल्या काही दिवसात एमएसपीत वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून कृषी कायद्यावरही अनेकदा चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांना यामधून लाभ मिळावा हाच सरकारचा उद्देश असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. भाषणामध्ये व्यत्यय आणणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचाही जोरदार समाचार घेत, पंतप्रधान म्हणाले की ही तीच कॉंग्रेस आहे जी राज्यसभेत वेगळ वागते आणि लोकसभेत वेगळ वागते.

- Advertisement -

बुधवारी लोकसभेत असणाऱ्या कॉंग्रेसच्या राहुल गांधी यांच्यासोबतच ममता बॅनर्जीच्या पक्षातील तसेच टीएमसीच्या कार्यकर्त्यांनीही सभेतून वॉकआऊट केले. आम्हाला वाटत की कॉंग्रेस हा देशातला सर्वात जुना पक्ष आहे. गेल्या सहा दशकांपासून कॉंग्रेसचे देशात राज्य होते. पण देशात सध्या कॉंग्रेसची अशी स्थिती आहे की देशात कॉंग्रेस दोन गटात विभागला गेलेला असा पक्ष आहे. कॉंग्रेसमध्येच इतका गोंधळ आहे की ज्यामुळेच ते देशासाठी काही योगदान देऊ शकत नाही. देशात कॉंग्रेसचा राज्यसभेचा एक गट एका दिशेने चालतो, तर लोकसभेतला दुसरा गट हा दुसऱ्या दिशेने चालतो. असा गोंधळातील पक्ष देशाच्या आव्हानांना काय सोडवणार असाही सवाल त्यांनी केला आहे. याहून आणखी देशाचे काय दुर्भाग्य ? असाही सवाल त्यांनी केला आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -