घरदेश-विदेशNew Year 2024 : काश्मिरमधील लाल चौकात पहिल्यांदाच नववर्षाचे जल्लोषात स्वागत

New Year 2024 : काश्मिरमधील लाल चौकात पहिल्यांदाच नववर्षाचे जल्लोषात स्वागत

Subscribe

जम्मू-काश्मिरच्या पर्यटन विभागाने श्रीनगरच्या घंटा घर (क्लॉक टॉवर) येथे विशेष लाइव्ह ऑर्केस्ट्राचे आयोजन केले होते. या लाइव्ह ऑर्केस्ट्राच्या तालावर घंटा घर परिसरात जमलेल्या स्थानिक नागरिकांनी, पर्यटकांनी ताल धरला आणि नवीन वर्षाचे हर्षोल्हासाने स्वागत केले.

श्रीनगर : संपूर्ण जगात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. फटाक्यांची आतषबाजीसह जगाने 2024 वर्षात पदार्पण केले आहे. भारतातही मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत झाले. भारतातील सर्वच पर्यटन स्थळे ही पर्यटकांनी गेल्या दोन दिवसांपासून फुलून गेली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेकांनी भारताच्या उत्तरेत जाऊन नवीन वर्षाचे जाऊन स्वागत केले. शिमला, मनाली, जम्मू-काश्मिर, उत्तराखंड येथील पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी विशेष गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. पण यंदा काश्मिरातील लाल चौकात पहिल्यांदाच नववर्ष उत्साहात साजरे करण्यात आले. (New Year 2024: For first time in Lal Chowk in Kashmir, New Year is welcomed with gaiety)

हेही वाचा… Photo : नववर्षाच्या सुरुवातीला गुजरातमधील नागरिकांनी मोडला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

- Advertisement -

जम्मू-काश्मिरच्या पर्यटन विभागाने श्रीनगरच्या घंटा घर (क्लॉक टॉवर) येथे विशेष लाइव्ह ऑर्केस्ट्राचे आयोजन केले होते. या लाइव्ह ऑर्केस्ट्राच्या तालावर घंटा घर परिसरात जमलेल्या स्थानिक नागरिकांनी, पर्यटकांनी ताल धरला आणि नवीन वर्षाचे हर्षोल्हासाने स्वागत केले. पण असा जल्लोष आणि उत्साह पहिल्यांदाच श्रीनगरच्या घंटा घर परिसरात पाहायला मिळाल्याचे मत येथील स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले. तर, पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांनी, पर्यटकांनी या परिसरात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी स्थानिक नागरिक मोहम्मद यासीन याने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, या ठिकाणी मी नवीन वर्षाचा जल्लोष पाहण्यासाठी आलो. असा जल्लोष मी याआधी पाहिला नव्हता. हे सर्व पाहून मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे. तर आणखी एका स्थानिक नागरिकाने सांगितले की, पहिल्यांदाच अशा पद्धतीने या ठिकाणी नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येत आहे. पर्यटन विभागामार्फत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काश्मीरमध्ये शांतता असावी, आणि ते शांततापूर्ण असावे अशी त्यांची इच्छा आहे. पण आता हे सर्व काही काश्मिरच्या खोऱ्यातील लोकांवर अवलंबून असल्याचेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

तर, दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग शहरातही नववर्षानिमित्त लेझर शो आणि संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोकांनी नृत्य करून नवीन वर्ष साजरे केले. याशिवाय देशातील विविध शहरांमध्ये नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -