घरदेश-विदेशखलिस्तानवादी संघटनांच्या चौकशीसाठी NIA ची टीम पोहचली कॅनडा, फरार पन्नूसह अनेक जण...

खलिस्तानवादी संघटनांच्या चौकशीसाठी NIA ची टीम पोहचली कॅनडा, फरार पन्नूसह अनेक जण निशाण्यावर

Subscribe

भारतात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खलिस्तानवादी संघटना आता राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) रडारवर आहेत. या संघटनांच्या चौकशीसाठी NIA च्या तीन अधिकाऱ्यांचे तपास पथक चार दिवसांच्या कॅनडा दौऱ्यासाठी पोहचल्या आहेत. या टीमच्या माध्यमातून खलिस्तानवादी संघटनांना मिळणाऱ्या आर्थिक निधीच्या स्त्रोताची माहिती घेतली जाणार आहे. एनआयए कॅनडाशिवाय जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि ब्रिटनमधून येणाऱ्या आर्थिक मदतीचा शोध घेईल.

याशिवाय दरवर्षी ऑपरेशन ब्लू स्टार, ८४ च्या शीख विरोधी दंगली, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि अगदी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजात फूट पाडण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी आणि देशविरोधी प्रचार करण्यासाठी खलिस्तानवादी संघटनांना आर्थिक मदत कुठून मिळते? याची चौकशी केली जाईल.

- Advertisement -

शीख फॉर जस्टिस (SFJ), बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) , खालिस्तान टायगर फोर्स (KTF) आणि खलिस्तान जिंदाबाद फोर्स ( KZF) अशा खलिस्तानवादी दहशतवादी संघटनांच्या कारवायांचा तपास करण्यासाठी एनआयएची टीम कॅनडाच्या सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NIA अधिकारी भारतविरोधी कारवायांशी संबंधित माहितीच्या देवाणघेवाणीसाठी परस्पर कायदेशीर सहाय्य कराराची अंमलबजावणी करण्याची मागणी करतील. जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि ब्रिटनमधून खलिस्तानी दहशतवाद्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीबाबत एनआयएकडे अधिक भक्कम माहिती आणि पुरावे आहेत.

- Advertisement -

शीख फॉर जस्टिसकडून वारंवार दिली जाते पैशाची लाच

१० जुलै २०१९ रोजी, UAPA कायद्यांतर्गत, शीख फॉर जस्टिस (SFJ) नावाच्या खलिस्तानी संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून SFJ स्वातंत्र्य दिनानिमित्त खलिस्तानी ध्वज फडकावणाऱ्याला बक्षीस जाहीर करत आहे. या संघटनेचे नेते गुरपतवंत पन्नू यांनी लाल किल्ल्यावर खलिस्तानी ध्वज फडकवणाऱ्याला २.५ लाख डॉलर म्हणजेच सुमारे १.८५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पन्नू यांनी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनांचा संबंध ८४ च्या शीखविरोधी दंगलीशी जोडण्याचाही प्रयत्न केला होता.

सार्वमत २०२० करून खलिस्तान निर्माण करण्याचा दावा तो अनेक वर्षांपासून करत आहे. एनआयएने १ जुलै २०२० रोजी गुरपतवंत सिंग पन्नू आणि इतर आठ दहशतवाद्यांना दहशतवादी घोषित केले. विशेष NIA न्यायालयाने पन्नूला २ ऑगस्ट २०२१ रोजी फरारी गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे.

गुरपतवंत सिंग पन्नू आणि इतर ८ खलिस्तानी दहशतवादी अनेक प्रकरणांमधील गुन्हेगार आहेत. पन्नू अमेरिकेतून खलिस्तानच्या नावाने लोकांकडून पैसे उकळतो, ज्याचा वापर भारतविरोधी प्रचार आणि दहशतवादी कारवायांसाठी केला जातो. अशी माहिती समोर आली आहे. खलिस्तानी रेफरेंडमच्या नावाखाली भारतात शिखांना भडकवण्यात अपयशी ठरलेल्या गुरपतवंत सिंग पन्नूला आता परदेशात रेफरेंडम घेत आहे.


अस्लम शेख यांचे काशिफ खानशी संबंध काय? कॉल रेकॉर्डची चौकशी करा, मोहित भारतीयांची मागणी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -