घरदेश-विदेशनिर्भया प्रकरणातील आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळली; फाशी होणार

निर्भया प्रकरणातील आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळली; फाशी होणार

Subscribe

दिल्लीमध्ये घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेल्या अक्षय सिंहने फाशीच्या शिक्षेविरोधात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी झाली असताना सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावत फाशीची शिक्षा कायम ठेवली. तीन न्यायमुर्तीच्या खंडपीठातील न्यायाधीस आर. भानुमती यांनी सांगितले की, २०१७ रोजी फाशीचा निर्णय दिला आहे, त्याबाबत कोणताही पुनर्विचार करण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाने आरोपीची याचिका फेटाळल्यानंतर निर्भयाची आई आशा देवी यांनी आनंद व्यक्त केला.

- Advertisement -

आरोपी अक्षय सिंहने मागच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. फाशीची शिक्षा रद्द केली जावी, अशी मागणी त्याने याचिकेमध्ये केली होती. मात्र, त्यासाठी त्याने दिलेलं कारण संतापजनक होतं. ‘दिल्लीतली हवा तशीही खूप प्रदूषित झालेली आहे. त्यामुळे तसाही कालांतराने मृत्यू होणारच आहे. मग आधीच आम्हाला फाशी का देता?’ असा संतापजनक प्रश्न याचिकेमध्ये विचारला होता.

अक्षय सिंहला दयेचा अर्ज दाखल करायचाय

आरोपी अक्षय सिंहचे वकील एपी सिंह यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले की, अक्षयला राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करायचा आहे. त्यामुळे त्याला तीन आठवड्याचा वेळ देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यानंतर सॉलिसिटर जनरल तुशार मेहता यांनी यावर आक्षेप घेत दयेचा अर्ज दाखल करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ देण्याची मागणी केली. मात्र सुप्रीम कोर्टाने दयेचा अर्ज हा कायद्यात विहीत केलेल्या वेळेनुसारच सादर करता येईल, असे सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -