घरCORONA UPDATEcovid-19 : कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरपी का ठरतेय निष्क्रिय? थेरपीमुळे काय होतेय नुकसान?...

covid-19 : कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरपी का ठरतेय निष्क्रिय? थेरपीमुळे काय होतेय नुकसान? जाणून घ्या

Subscribe

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हैदोस घातला असून यात मृतांची संख्या वाढत आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोना विषाणूने गंभीर रुप घेतले आहे. याच दरम्यान कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी निष्क्रीय ठरत असल्याची माहिती आरोग्य तज्ज्ञांकडून दिली जात आहे. तसेच नॅशनल टास्क फोर्स सदस्यांनी कोरोनावरील उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपी क्लिनिकल प्रोटोकॉलमध्ये समाविष्ठ केली नाही. त्यामुळे आता केंद्र सरकारनेही कोरोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीत टास्क फोर्सकडून नव्याने मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहे. परंतु कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरपी का ठरतेय निष्क्रीय? किंवा या थेरपीमुळे काय नुकसान होतेय? याबाबतची माहिती आयसीएमआरच्या वैज्ञानिक आणि प्लाझ्मा रिसर्चमध्ये काम करणाऱ्या डॉ. अपर्णा मुखर्जी यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.

प्लाझ्मा थेरपीासंदर्भात झाले अनेक रिसर्च 

कोरोनाबाधित प्रौढ नागरिकांवर आता प्लाझ्मा थेरपी वापरली जाणार यामागे नेमके काय कारण आहे. यासंदर्भात बोलताना डॉ. मुखर्जी सांगतात की, गेल्या वर्षी प्लाझ्मा थेरपीाबाबत अनेक रिसर्च समोर आले. त्यामुळे रुग्णांवरील उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपीचा काहीच उपयोग होत नसल्याचे समोर आले. त्यानंतर केंद्राने या नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या.

- Advertisement -

प्लाझ्मा थेरपी का हटवण्यात आली ? 

दरम्यान भारतात अनेक कोरोनाबाधित रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देत उपचार झाले यामुळे अनेक रुग्ण बरेही झाले असे असतानाही प्लाझ्मा थेरपी का हटवण्यात आली असा सवाल उपस्थित होत आहे. य़ावर बोलताना डॉ. मुखर्जी सांगतात की, अनेक आजारांमध्ये प्लाझ्मा थेरपीचा उपयोग केला जात आहे. यानंतर अनेक साईड इफेक्ट काही तासांनी दिसतात. तसेच काही वेळा अॅलर्जीही होते. दरम्यान आपल्या देशात प्लाझ्मा दिल्यानंतर काही नुकसान झाले आहे अशा घटना समोर आल्या नाहीत परंतु फायदा झाला आहे असेही नाही.

NTF ने प्लाझ्मा थेरपी हटवण्याचा घेतला निर्णय 

दरम्यान टास्क फोर्स सदस्यांनी कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपी निष्क्रीय ठरत असल्यासंदर्भात असे कोणते पुरावे सादर केले ज्यामुळे प्लाझ्मा थेरपी उपचारांतून वगळण्यात आली. यावर डॉ. मुखर्जी सांगतात. प्लाझ्मा थेरपी उपाचार पद्धती संदर्भात अनेक संशोधन करण्यात आले. ज्यामध्ये प्लाझ्मा थेरपी रुग्णांवर निष्क्रीय ठरत असल्याचे समोर आले आहे. या ,संशोधनांचा अभ्यास करत NTF ने प्लाझ्मा थेरपी हटवण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

रुग्णांवर आता कोणत्या पद्धतीने होईल उपचार ?

परंतु आता प्लाझ्मा थेरपी रद्द झाल्याने रुग्णांवर कोणत्या पद्धतीने उपचार होईल असा प्रश्न विचारला जात आहे. परंतु यावर असे सांगितले जात आहे की, देशात सध्या कोरोना उपचारांसाठी असलेल्या गाईडलाईन्स आहे तशाच आहेत. कारण या विषाणूवरील उपचारांसाठी ठोस असे औषध नाही. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय वापरणे हाच पर्याय आहे. सध्या अत्यंत गंभीर स्थितीत व्हेंटिलेशन किंवा प्रोनिंगचा फायदा होत आहे.

दरम्यान अनेकांकडून प्लाझ्मा थेरपीनंतर होणाऱ्या धोक्यासंदर्भात विचारले जात आहे. यावर डॉ मुखर्जी सांगतात. आम्ही वारंवार सांगत आहोत की प्लाझ्मा थेरपीनंतर कोणताही मोठा धोका निर्माण होत नाही. ब्लड प्रोडक्टमध्ये काही साइड इफेक्ट दिसून येतात. परंतु त्यामुळे काही नुकसान होत नाही. परंतु आता प्लाझ्मा थेरपी करण्यासाठी ज्याप्रकारे धावपळ केली जात आहे त्याचा काहीच फायदा होत नसल्य़ाचेही समोर आले आहे.


 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -