घरदेश-विदेशNoor Inayat Khan: भारतीय वंशाच्या पहिल्या महिला गुप्तहेर, ब्रिटनमध्ये होतोय सन्मान

Noor Inayat Khan: भारतीय वंशाच्या पहिल्या महिला गुप्तहेर, ब्रिटनमध्ये होतोय सन्मान

Subscribe

भारतीय वंशाच्या पहिल्या महिला गुप्तहेर नूर इनायत खान यांचा ब्रिटनमध्ये सन्मान होणार आहे. दुसर्‍या महायुद्धात ब्रिटनसाठी गुप्तहेर म्हणून काम करणऱ्या नूर इनायत खान यांना ‘ब्लू प्लेक’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. लंडनमधील त्यांच्या पूर्वीच्या निवासस्थानाबाहेर त्यांची कामांची यादी करुन त्याचा फलक लावण्यात येणार आहे. ब्लू प्लेक योजना ब्रिटीश हेरिटेज चॅरिटीद्वारे चालविली जाते. याअंतर्गत लंडनमधील विशिष्ट इमारतीत राहून काम केलेल्या अशा प्रतिष्ठित व्यक्तींचा सन्मान केला जातो.

ब्लूम्सबरी येथील फोर टेविटन स्ट्रीटस्थित नूर इनायत खान यांच्या पूर्वीच्या निवासस्थानाला ब्लू प्लेक देण्यात येईल, जिथे त्यांने द्वितीय विश्वयुद्धात हेरगिरी केली होती. म्हैसूर शासक टीपू सुलतान यांचे वंशज आणि भारतीय सूफी संत हजरत इनायत खान यांची मुलगी, नूर या दुसरे महायुद्धातील ब्रिटनच्या विशेष ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह (एसओई) च्या एजंट होत्या. वयाच्या ३० व्या वर्षी १९४४ मध्ये त्यांना नाझींनी पळवून नेले आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली. नूर यांनी शेवटच्या मोहिमेवर जाण्यापूर्वीच हे घर सोडले.

- Advertisement -

इतिहासकार आणि ‘स्पाई प्रिन्सेस: द लाइफ ऑफ नूर इनायत खान’ या पुस्तकाचे लेखक शरबानी बसू म्हणाले, “नूर इनायत खान शेवटच्या मिशनवर जाण्यापूर्वी या घरात राहत होत्या. त्या एक धाडसाचे उदाहरण बनतील हे स्वप्नातही वाटले नव्हते.” नूर इनायत खान मेमोरियल ट्रस्टचे सह-संस्थापक शरबानी बसू यांनी २०१२ मध्ये गार्डन स्क्वेअरमध्ये नूर यांचा पुतळा बसविला होता. १९४० मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी स्वतंत्र ब्रिटीश सीक्रेट सर्व्हिस म्हणून एसओईची स्थापना केली. नूर या पहिल्या महिला रेडिओ ऑपरेटर होत्या. १९४९ मध्ये त्यांना मरणोत्तर जॉर्ज क्रॉसने सन्मानित केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -