घरदेश-विदेशकिम जोंगच्या उत्तर कोरियाचा नवा प्रताप

किम जोंगच्या उत्तर कोरियाचा नवा प्रताप

Subscribe

आम्ही कुठेही अण्वस्त्र हल्ला करु शकतो, अशी धमकी उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग देत होता. खासकरुन अमेरिका व उत्तर कोरियाचे या विषयावरुन अनेक दिवस ‘कोल्ड वॉर’ चालू होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उनची पुढच्या महिन्यात सिंगापूरमध्ये भेट होत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने अणवस्त्र चाचणी तळ नष्ट केला आहे. शिवाय कुणाच्या मनात किंतु राहू नये यासाठी खास परदेशी पत्रकारांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. गुरूवारी पत्रकारांच्या उपस्थितीत स्फोट घडवून उत्तर कोरियाने अणवस्त्र चाचणी तळ नष्ट केला आहे. उत्तर कोरियाने घेतलेला निर्णय जागतिक शांततेच्या दृष्टीने स्वागतार्ह असा आहे

का उचलेले उत्तर कोरियाने पाऊल?

- Advertisement -

उत्तर कोरिया सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. परिणामी आता उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया आणि अमेरिकेकडे मदतीचा हात पुढे केला आहे. आर्थिक संकटातून बाहेर पडण्याकरता उत्तर कोरियाला महत्त्वाचे पाऊल उचलणे गरजेचे होते. त्याचाच विचार करून उत्तर कोरियाने आपले अण्वस्त्र तळ नष्ट केले. मागील काही वर्षात उत्तर कोरियाने कुणालाही न जुमानता अण्वस्त्र चाचण्या केल्या होत्या. त्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातील काही क्षेपणास्त्रे ही जपानवरून गेली होती. वारंवारं सांगून देखील उत्तर कोरियाने कुणालाही जुमानले नव्हते. पण, आता मात्र परिस्थितीला सामोरे जात अण्वस्त्र स्थळ नष्ट केले आहे.

मागच्या आठवड्यात देखील उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये होणारी बैठक रद्द झाली होती. यामागे अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये होणारा मॅक्स थंडर या दोन्ही देशांमधल्या संयुक्त लष्करी सरावाचे कारण होते. पण आता मात्र उत्तर कोरियाने अण्वस्त्र स्थळ नष्ट करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे जगाने देखील हुश्श ! सुटलो. अशी प्रतिक्रिया दिली असणार हे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -