घरदेश-विदेशआता पुन्हा रहा सतर्क; बंगालच्या उपसागरात घोंगावतेय चक्रीवादळ

आता पुन्हा रहा सतर्क; बंगालच्या उपसागरात घोंगावतेय चक्रीवादळ

Subscribe

आता बंगालच्या उपसागरात पुन्हा नवं चक्रीवादळ घोंगावत असून, यामुळे देशातील 12 राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : सध्याच संपूर्ण देशात अतिवृष्टीमुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. हे कमी होते की तर आता पुन्हा नवीन चक्रीवादळ येणार असून, यामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

महिनाभरापूर्वी अरबी समुद्रात दाखळ झालेल्या बिपरजॉय वादळामुळे गुजरात आणि राजस्थान राज्यामध्ये प्रचंद नुकसान झाले होते. त्यानंतर संपूर्ण देशात मान्सून सक्रीय झाला. आता संपूर्ण देशात धो-धो पाऊस बरसत असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे दरड तर कुठे इमारत कोसळून नागरिक ठार होत असल्याच्या घटना घडत आहेत. एवढे असतानाही आता बंगालच्या उपसागरात पुन्हा नवं चक्रीवादळ घोंगावत असून, यामुळे देशातील 12 राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

- Advertisement -

या राज्यांवर कोपणार ‘वरुणराजा’
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, हिमाचल प्रदेश, राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार बेटे, किनारी आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, तामिळनालडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये या चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस कोसळणार आहे. या राज्यांमध्ये 64.5 मिमी ते 115.5 मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

हेही वाचा : आश्चर्य वाटते, अद्याप मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट का नाही लावली? -आव्हाड

- Advertisement -

यामुळे आहे धोकादायक हे चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होत आहे. हे पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर तयार होत आहे. हे वादळ समुद्रसपाटीपासून 5.8 ते 7.6 किमी उंचीवर असून, यामुळे 24 तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : आता नवी समस्या; विनापरवानगी मणिपूरमध्ये घुसले म्यान्मारचे नागरिक

उत्तर प्रदेशला पुराचा धोका
एका खासगी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार,मंगळवारी दिल्लीमध्ये यमुना नदीची पाणी पातळी ही 205.45 मीटर इतकी आहे. ही पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक आहे. हरिद्वारमध्ये गंगेच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. या दोन्ही नद्या पुढे उत्तर प्रदेशमधील अनेक भागांमधून वाहतात. त्यामुळेच उत्तर प्रदेशला आगामी काही दिवसांमध्ये पूराचा फटका बसण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -