घरदेश-विदेश५०० रुपयात करा विमान प्रवास!, 'या' एअरलाईन्सची मेगा ऑफर

५०० रुपयात करा विमान प्रवास!, ‘या’ एअरलाईन्सची मेगा ऑफर

Subscribe

एअर एशियाचे हे तिकीट वेबसाईट किंवा मोबाईल अॅपवर बुक करता येणार आहे. दिल्ली, बंगळुरु आणि कोलकाता याठिकाणाहून बुकींग करता येणार आहे.

तुम्ही अद्याप विमान प्रवास केला नसेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता केवळ ५०० रुपयात तुम्हाला विमान प्रवास करता येणार आहे. सगळ्यात कमी तिकिटांचे दर असलेल्या एअर एशिया या कंपनीने प्रवाशांसाठी सूपर सेल ऑफर आणली आहे. ही ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला २३ सप्टेंबर पर्यंत तिकीट बुकिंग करावे लागणार आहे.

काय आहे ऑफर?

एअर एशियाची ही ऑफर ५०० रुपयांपासून सुरु होणारी आहे. तिकिटांचे दर हे अंतर आणि प्रवासाचा वेळ यावर ठरवण्यात आली आहे. यातील कमीत कमी तिकीट ५०० रुपयांचे असणार आहे. तर त्यापुढे १ हजार आणि १हजार ५०० रुपये तिकिट असणार आहेत.  प्रवाशांना २३ सप्टेंबरपर्यंत बुकींग करायचे असून त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत प्रवास करता येणार आहे. आजपासून ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे तुमचे बाहेर जाण्याचे काही प्लॅन असतील तर लगेट तिकीट बुकींग करा.

- Advertisement -
airasia
एअर एशिया (फोटो प्रातिनिधिक आहे)

या प्रवासासाठी ऑफर

एअर एशियाचे हे तिकीट वेबसाईट किंवा मोबाईल अॅपवर बुक करता येणार आहे. दिल्ली,मुंबई, बंगळुरु आणि कोलकाता या ठिकाणाहून बुकींग करता येणार आहे. ही ऑफर डोमेस्टिक प्रवासासाठी देण्यात आली आहे.  देशभरातील २१ अन्य शहरांमध्ये या तिकिटांचा लाभ घेता येणार आहे. यात प्रामुख्याने हैदराबाद, विशाखापट्टणम, गुवाहाटी, चंदीगढ, सूरत, अमृतसर, जयपूर, कोची, इंदौर आणि नागपूर यांचा समावेश आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही ऑफर फायद्याची असणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -