घरमनोरंजनएम्मी पुरस्कारांवर गेम ऑफ थ्रोन्सची छाप

एम्मी पुरस्कारांवर गेम ऑफ थ्रोन्सची छाप

Subscribe

एचबीओ वाहिनीवरील GOT म्हणजेच ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या सीरीजचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही मालिका गेली सात वर्षे प्रेक्षकांची मने जिंकत आहे, त्यासोबत या मालिकेने विविध पुरस्कारांवरदेखील नाव कोरले आहे. काल गेम ऑफ थ्रोन्सच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. प्रतिष्ठित अशा ७० व्या एम्मी पुरस्कार सोहळ्यामध्ये गेम ऑफ थ्रोन्सने यंदा तीन पुरस्कार मिळवले आहेत. त्यामुळे गेम ऑफ थ्रोन्सच्या टिममध्ये सध्या आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. काल लॉस अँजेलिस येथे एम्मी पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला टिममधील बहुतेक सर्वच प्रमुख कलाकारांनी उपस्थिती लावली होती. तीन पुरस्कार मिळाल्यानंतर जीओटीच्या टीमने जल्लोष केला.

- Advertisement -

‘हे’ पुरस्कार मिळाले

एम्मी हा मालिका विश्वातील जगातला सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. अनेक समीक्षक याला मालिकांसाठीचा ऑस्कर म्हणतात. गेम ऑफ थ्रोन्सला एम्मी पुरस्कार सोहळ्यामध्ये तीन पुरस्कार मिळाले आहेत. यापैकी सर्वात पहिला आणि मोठा पुरस्कार म्हणजे या मालिकेला सर्वोत्कृष्ट ड्रामा या विभागात पुरस्कार मिळाला आहे. मालिकेला सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स या विभागात पुरस्कार मिळाला आहे. या मालिकेतील सर्वांचा लाडका टेरियन लॅनिस्टर (मालिकेतील पात्राचे नाव) म्हणजेच पीटर डिंक्लेज याला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. शिवाय या मालिकेला तब्बल सात नामांकनं मिळाली होती.

- Advertisement -

GOT बद्दल बोलू काही

जगातली सर्वात जास्त पाहिली गेलेली सीरीज म्हणूनही जीओटीचा उल्लेख केला जातो. आतापर्यंत या सीरीजचे सात सिझन प्रदर्शित झाले आहेत. शेवटचा आणि आठवा सिझन एप्रिल २०१९ मध्ये होणार आहे. एका सिंहासनासाठी सात साम्राज्यांचा संघर्ष या मालिकेत गेली सात वर्षे सुरू आहे. परंतु आता यामध्ये एका नव्या खलनायाकांची भर पडली आहे. उत्तरेकडून व्हाईट वॉकर्स (न मरणारे शक्तीशाली राक्षस) या सात साम्राज्यांवर आक्रमण करण्यासाठी येणार आहे. ते आता विंटरफॉल साम्राज्याच्या सीमेवर येऊन धडकले आहेत. आता आठव्या सीझनमध्ये सात साम्राज्यांमधील मानसं आणि व्हाईट वॉकर्समध्ये युद्ध होणार असल्याने प्रेक्षकांची उत्कंटा ताणली गेली आहे. नुकताच एचबीओने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यामध्ये जीओटीसहीत इतर मालिकांची झलक पाहायला मिळाली आहे. जीओटीच्या प्रत्येक चाहता अगदी चातकाप्रमाणे या आठव्या सीझनची वाट पाहत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -